Skip to main content

'उषःकाल होता होता' : एक शंका

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/08/2017 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले. मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले. तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?

चारोळी

लेखक Swapnaa यांनी गुरुवार, 03/08/2017 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म दात्यांविना आयुष्य एकदम आहे व्यर्थ खरंच ह्या संघर्षाला किती आहे अर्थ, कवी-स्वप्ना..
काव्यरस

चॅलेंज भाग 2

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 03/08/2017 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या.

श्रावणातल्या कहाण्या

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 02/08/2017 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी श्रावणामध्ये दर रविवारी घरच्या देवांची पूजा झाल्यानंतर आजी आदित्यराणूबाईची कहाणी वाचायची. ही कहाणी ऐकायला  घरात असणाऱ्या सर्वांनी बसलच पाहिजे तिचा हा नियम होता. मी, भाऊ, बाबा, आई एवढेच नाही तर अगदी आमचे माळी मामा, ड्रायवर दुबेजी, घरी कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई सर्वांना हातावर तांदळाचे तीन दाणे घेऊन देवासमोर बसावे लागायचे. त्यावेळी काहीतरी वेगळं करतो आहोत म्हणून मस्त वाटायचं आम्हाला. मी आणि माझा भाऊ जसजसे मोठे झालो तसे ही कहाणी आम्ही आवडीने वाचायला लागलो होतो. ही कहाणी म्हणजे मुळात सुर्यनारायणाची उपासना आहे.

जनरेशन गॅप आणि निळाई

लेखक झपाटलेला फिलॉसॉफर यांनी बुधवार, 02/08/2017 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

श्री महेश गिरी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे अभिनंदन.

लेखक साहना यांनी मंगळवार, 01/08/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षां पासून "शिक्षणाचा अधिकार कायदा" रद्दबातल करावा आणि ९३वी घटनादुरस्ती रद्दबातल करावी ह्यावर आमचे बरेच काम चालू आहे. ह्या संसदीय सत्रांत ह्या दृष्टीने बरीच प्रगती झाली (थोडी का असेना पण प्रगती आहे). भाजपचे श्री महेश गिरी ह्यांनी खाजगी बिल आणून ९३वी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याची मागणी केली.

Mt रशमोर वरील लेख

लेखक निरंजन._. यांनी मंगळवार, 01/08/2017 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी मिपा वर ( कदाचित माबोवर असेल) एक माऊंट रशमोर वरील लेख वाचला होता... आज एका मित्राबरोबर बोलताना मी त्याला खुप कौतुकाने त्याबद्दल सांगितल.. आता त्याला तो लेख वाचायचा आहे (आणि मलाही परत वाचायचा आहे) . खुप प्रयत्न केले पण तो सापडत नाही.. मी त्यावेळी इथं नवीन असल्यामुळे निवडक १० मधे देखील टाकला नव्हता.. कोणी त्याची link देऊ शकेल का?? लेखिका आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेली होती आणि Airbnb मधून राहण्याचं booking केलं होतं ... इतकं आठवतंय.

हंटे लंटिहिलेलं तंटुम्ही वंटाचू शंटकता कंटा?

लेखक सचिन काळे यांनी मंगळवार, 01/08/2017 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
हा! हा!! हा!!! मला माहितेय! वरील शीर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल. तुम्हाला वाटलं असेल, काय लिहिलंय हे!!? आफ्रिकेच्या जंगलातील कोण्या आदिवासी लोकांची भाषा दिसतेय ही. वाचताना असं वाटतं की, सर्व आदिवासींनी मिळून एक मोठी शिकार केलीय. मैदानात उघडेबंब, अंगावर चट्टेपट्टे ओढलेले आणि हातात भाले वगैरे घेतलेले लहानथोर सर्व आदिवासी जमलेत. मधोमध मोठ्या शेकोटीवर शिकार भाजायला लावलीय. आणि त्याभोवती सर्व फेर धरून नाचतायत आणि गातायत. "झिंगालाला! होsss!! टुंबक्टू! टुंबक्टू!! टुंबक्टू!!!" हा! हा!! हा!!! अहो असं काही नाहीए. ही उटपटांग भाषा कोणतीए, सांगतो! सांगतो!

थोर लेखक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/08/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘अंतर्नाद’ ऑगष्ट 2017 च्या नियतकालिकात ‘थोर लेखक’ नावाची ही कथा प्रकाशित.) ...ज्युनियर लेखकाने सिनियर लेखकाची कादंबरी वाचली आणि कादंबरी आवडल्याचं सिनियर लेखकाला पत्राने कळवलं. सिनियर लेखकाने पत्रोत्तरात ज्युनियर लेखकाला कादंबरीवर समीक्षा लिहायचा आग्रह केला. उत्साहाच्या भरात ज्युनियरने सिनियरला होकार कळवला. सोबत आपल्या पाच-सहा कविता सिनियर लेखकाकडे अभिप्रायासाठी पाठवून दिल्या आणि समीक्षा लिहिण्यासाठी कादंबरी पुन्हा एकदा वाचू लागला.