Skip to main content

चारोळी

लेखक अमित रेडीज यांनी गुरुवार, 24/08/2017 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ढग भरून आले कि नेहमीच पाऊस पडतो पण मन भरून आलं कि त्याला एकांताचाच कोपरा लागतो

महामानव

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 24/08/2017 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य तो अन काजवा मी, जाणुनी होतो जरी धावलो धुंदीत एका, थुंकण्या त्याच्यावरी मत्त तो गजराज, मी तर श्वान श्रीमंताघरी लागता चाहूल उठलो, भुंकण्या त्याच्यावरी भेट होता आमुची, प्रत्यक्ष दिसले मज परी माझिया हातात पत्थर, चांदण्या त्याच्या करी
काव्यरस

अनवट किल्ले १७: गुरुचरित्राचा दाखला , महिपालगड(Mahipalgad )

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 24/08/2017 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही किल्ल्यांची नावेच त्याचे प्राचिनत्व स्पष्ट करतात. असाच एक बेळगावजवळचा किल्ला "महिपालगड". प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही. औरंगजेबाच्या वावटळीत काकतीचा देसाई आणि हुक्केरीचा देसाई अलगोंडा यांनी मोगलातर्फे या भागातील किल्ले ताब्यात घेतले होते, त्यात कदाचित हा असेल. ईथे जायचे म्हणजे दोन मार्ग आहेत. १ ) बेळगाव- सावंतवाडी रस्त्यावर शिनोळी नावाचे गाव आहे. इथुन देवरेवाडी नावाच्या गावाकडे रस्ता जातो. हाच डांबरी रस्ता पुढे थेट गडावर जातो. शिवाय जाता जाता आरोग्यभवानी , वैजनाथाचे मंदिर व कार्तिकस्वामी गुंफा पहायला मिळते. बेळगाववरून गडावर यायला बससेवा आहेत. या बसेसच्या वेळा सकाळी ८.३०, १०.०० ( देवरेवाडी),१२.००, २.००( देवरेवाडी), ४.००, ७.००, ९.००( मुक्कामी). स्वताची गाडी असेल तर कोल्हापुर- बेळगाव रस्त्यावर यमनापुर गावातून थेट चंदगड रस्त्याला लागायचे आणि वर सांगितल्याप्रमाणे शिनोळी मार्गे गडावर. २ ) दुसरा मार्ग म्हणजे गडहिंगलजमार्गे कोवाड ते थेट महिपालगड असा आहे. पण कच्चा रस्ता आणि वैजनाथाचे मंदिर दुसर्‍या बाजुला राहिल्यामुळे हा मार्ग सोयीचा नाही. mhp1 महिपालगड परिसराचा नकाशा मी बेळगाव परिसरातील गड पहायचे ठरविले. आधी हुन्नुरगड पाहून बेळगाव गाठले. तिथला भुईकोट पाहून दुसर्‍या दिवशी महिपालगडाचा प्लॅन केला. पण दुसरा दिवस रंगपंचमीचा होता. त्यामुळे बससेवा बंद केली गेली. सहाजीकच एस.टी.ने शिनोळी गाठले. इथे देवरेवाडीपर्यंत जाण्यासाठी काहीही मिळणार नाही हे समजल्यानंतर लेफ्ट-राईट शिवाय पर्याय नव्हता. चलो देवरेवाडी. चालत निघाल्यानंतर बरेच लष्करी ट्रक ये जा करीत होते. महिपालगडाच्या शेजारच्या पठारावर हे लष्करी जवान प्रस्तरारोहणाचा व ईतर काही साहसी गोष्टींचा सराव करतात असे समजले. वाटेत दुतर्फा स्टीलचे कारखाने दिसत होते. mhp2 समोर आडव्या भिंतीसारखा पसरलेला महिपालगड दिसत होता. गावात रंगपंचमीचा यथेच्छ धुडगुस चालु होता. त्यामुळे गावाच्या आधीच उजव्या बाजुच्या शेताडीत घुसलो आणि एक देउळ दिसले त्याच्या दिशेने चालु लागलो. mhp29 एक सुंदर गजाननाची मुर्ती असलेले मंदिर पाहून डांबरी रस्ता गाठला. थोडा चढ चढल्याबरोबर एक मंदिराचे संकुल सामोरे आले.

मुहूर्तांचे प्रस्थ

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 24/08/2017 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे १५ वर्षांपूर्वीची घटना. भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. अब्दुल कलाम यांची निवड झाली होती. भारतीयांच्या दृष्टीने ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट होती. कलाम यांनी ते पदग्रहण करताना एक अतिशय चांगला पायंडा पाडला तो म्हणजे, आपल्या पदाची कारकीर्द सुरू करण्यासाठी ते मुहूर्त बघण्याच्या अजिबात फंदात पडले नाहीत. त्यांना नेमणूकीचे पत्र मिळाल्यानंतरचा पहिला शासकीय कामाचा दिवस हाच त्यांच्या दृष्टीने ‘मुहूर्त’ होता.

फ्यूज -२

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 24/08/2017 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
फ्यूज १ ------------- सकाळ झालेली असते. सुर्य उगवलेला असतो. नदी वाहत असते. मग मी त्यात आंघोळ करून घेतो. मला चांगलं वाटतं. मग मी आंडरवेअर पिळून घेतो. मग घरी जाऊन तारेवर टाकतो. मग चौक असतो. चौकात लोकं आसतात. गाड्या रिक्षा टेम्पो भरपूर प्रमाणात पळत आसतात. मी गणपतीच्या देवळात जाऊन तिथला भात खातो. मला चांगलं वाटतं. मग दुपार झालेली असते. ऊन पडलेलं असतं. चौथऱ्यावर सावली असते. सावलीत झोप चांगली येते. माणसाने कायम सावलीत झोपावे. मग त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होत असते. संध्याकाळी माणसं सावलीतून उठून आपल्या आपल्या घरी जातात.

हायकूचा पहिला प्रयत्न !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 23/08/2017 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक पक्षी अंधारात बरसणाऱ्या जलधारात घरट्यात एकटाच . . . . झाडावरचं एक फूल उमलून कोमेजलेलं झाडाच्याच पायाशी ...... पाहतो शून्यात मी आजकाल नेहमी विश्व निर्मिती तिथूनच ! जुळवले शब्द काही अर्थ उमगलाच नाही तरीही अर्थपूर्ण !

धूम्राक्ष : अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/08/2017 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
मानव ऋषीने मोठ्या प्रयत्नाने दगडांना घासून अग्नी प्रज्वलित केली. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना सुरु केली. हे अग्नी, सर्व संसारिक सुख आम्हाला प्रदान कर, गाई- म्हशी, दूध-तूप, धन-धान्य प्रदान कर. आम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंवर विजय मिळवून दे. "अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम:". 'तथास्तु' एक आवाज ऐकू आला. मानव ऋषीने पाहिले, हवन कुंडातून एक धुम्र्वर्णी अशरीरी आकृती, हात जोडून उभी होती. मानव ऋषीने प्रश्नार्थक नजरेने बघितले. मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझे भोजन आणि मानवाच्या इच्छा पूर्ण करणे, हाच माझा धर्म. आज्ञा करा, ऋषिवर.