Skip to main content

चाळ तशीच आहे.

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 29/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
चाळ तशीच आहे. आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच. १०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही. पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात. चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत.

स्फुट : अनुभव

लेखक राघव यांनी शुक्रवार, 29/11/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!! हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.

महाराष्ट्र सत्तानाट्य २०१९, विश्लेषण

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 28/11/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नोटः प्रत्यक्ष राजकारणावरील हा माझा अलिकडच्या काळातील पहिलाच लेख... मला वयक्तीक राजकिय मते आहेत. पण तीच मते बरोबरच आहेत असा माझा कुठलाही दावा नाही. एक सामान्य माणुस म्हणुन समोर जे दिसते आणि जे मनाला वाटते यावरुन हे लिखान आहे. त्यात मला देशातील ३ नेते सर्वात जास्त आवडतात आणि ते आहेत स्व. माननीय अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते श्री. शरद पवार आणि हिंदू ह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे. तसेच, राजकीय विचार हे प्रत्येक माणसाचे असावेतच, या मताचा मी आहे. त्यात सर्व पक्षाचे समर्थन करणारे माझे अगदी जवळचे मित्र आहेत त्यामुळे हेच बरोबर आणि तेच चुकीचे असे माझे म्हणणे नाही.

सायंकाळी तुताऱ्या वाजतील

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 28/11/2019 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळी तुताऱ्या वाजतील, तोफा हि परवानगी असती तर उडवल्या असत्या, जोर जोरात उर बडवून मोठ्याल्या गर्जना करण्यात येतील कि पहा बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली वैगरे वगैरे..

मेळघाट ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 27/11/2019 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)
काव्यरस

दोसतार - २४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44978
चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.
धबधबा दिसणार या विचारानेच सगळे पुन्हा ताजेतवाने झाले. गेलेला चा दम परत आला . मलूल झालेल्या फुग्यात पुन्हा हवा भरल्यावर दिसावा तसे आमचे चेहरे पुन्हा चमकू लागले.