थांब ना
थांब ना जरा... अरे आज शेवटचं भेटतो म्हटलास ना? मग निदान आता घाई तरी नको करूस.
संबंध शरीराला भूल दिल्यासारखं होतंय मला. माझ्यातल्या जीवंतपणाला जीवनाचं रुप तुझ्या सोबत मिळालं. सातशे... तब्बल सातशे कोटी लोकसंख्या आहे जगाची. तरी मग तुलाच कशी रे माझ्या मनाची किल्ली गवसली? तू असलास की विस्मरणात गेलेले सगळे आनंदाचे क्षण मनात पुन्हा पिंगा घालू लागत. तुझ्या खांद्यावर रडत रडत दु:ख हलकं करायचे त्याचंही मला सुखच लागायचं. माझा श्वास आज मला सोडून जातोय तर हृदयाची तडफड होणार नाही का रे..? आणि माझं सगळं त्राण आजच का संपलंय?
मिसळपाव