अनामिका
मला प्रेम करायला तिने शिकवले. तिरस्कार कसा करावा हे ही मी तिच्याकडूनच शिकलो. तिचे डोळे नेहमी सांगायचे, की नजर बोलकी असते. ती रसिका होती अन् मी मनातला भावतरंग. ती दृश्य तर मी अदृश्य. मला माझ्याच शब्दांत पकडून हरवणे फक्त तिचीच मक्तेदारी होती. तिच्यासाठी माझे शब्दही माझ्याशीच दगा करायचे.
आम्ही तासंतास सोबत असायचो. पण मी तिला कधी बोलूच द्यायचो नाही. वाटायचं की तिला असंच जपून ठेवावं. तिच्या जीवाला काही तोशीस नाही पडू द्यावी. मग तिच्या वाट्याचं बोलणं सुद्धा मीच बोलायचो... माझ्याशी. तिच्या नजरेचे वर्णन मी पामराने काय करावे? त्या पाणीदार डोळ्यांत जणू सारा समुद्र सामावलेला असायचा.
हॅरी पॉटरच्या भाषेतलं पत्र!
सर्वांना नमस्कार!
इतकी मुलं सगळं काही बाजूला ठेवून तासन् तास हॅरी पॉटर कसे वाचू शकतात असा प्रश्न मला पडला होता. इतकं त्यामध्ये काय आहे असं वाटायचं. आणि असंही वाटलं की, मुलांसोबत चांगला डायलॉग करायचा असेल तर हॅरी समजून घ्यायला पाहिजे. शिवाय जगामधलं जर सर्वाधिक वाचलं जाणारं साहित्य ते असेल, तर मग तर समजूनच घ्यायला पाहिजे असं वाटलं. त्यातून हळु हळु हॅरी जगाची ओळख झाली. आणि माझ्या हॅरी भक्त परायण बहिणींच्या मदतीने अक्षरश: अखंड हॅरी नाम सप्ताहातील हॅरी पॉटाप्रमाणे सलग आठही दिवस आठ चित्रपट बघितले (लॉकडाउनचा सदुपयोग करून). शिवाय पुस्तकही वाचायला सुरुवात केली. आणि खूप छान जग उलगडत गेलं.
लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच,
"श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.
प्रवासी
एका दिशेचा भेटला किनारा
प्राक्तनाची दौड बाकी
वाट दे तू सागरा.
नाव माझी हलकी जरी
मी खलाशी रानातला.
लाटांची वादळे प्रचंड
उरात लाव्हा तप्तला.
आकाशी दुंदुभी गर्जना करावी
वाऱ्यासवे वेगाची स्पर्धा हरावी.
उन्मळून पडले गर्ववृक्ष सारे
ओहोटीत गेले जीव सर्व प्यारे.
पाहुणा मग पाऊस आला
भरावया एक रिक्त प्याला.
प्याला-होडी ची गल्लत मोठी झाली
वल्हवणी आता पाण्यात शांत झाली.
हे भास्करा, नको होऊस तू लुप्त
लढणाऱ्यांना किती ठेवशील गुप्त.
चांदण्यांचे मर्म थोडे वाटून घे
निशेस सावलीची साथ दे.
मिश्रफलमधु अर्थात मिक्सफ्रुट जॅम
साहित्य :- जी मिळतील ती सर्व फळे , साखर , टिकवण्यासाठी सायट्रिक ऍसिड(पावडर) पाव चमचा, रंग व इसेन्स हवे असल्यास.
सगळी फळे स्वच्छ धुऊन लोणच्याला कैरीच्या करतो त्या आकारात फोडी करून घ्यावी. (मी 3चिक्कू, 3सफरचंद,4केळी,अर्धे टरबूज,पाव अननस,1पपई,2आंबे अशी फळे घेतली.)
जाड बुडाच्या पातेल्यात थोडे पाणी घेऊन सगळ्या फळफोडी त्यात टाकाव्या मंद ते मध्यम आचेवर गॅसवर झाकण टाकून शिजवून घ्याव्या.
Taxonomy upgrade extras
बेचव बकवास
सगळ्यात आधी मिसळ-पाव हॉटेलामध्ये आमच्या सारख्या पामरास आपला ठेला लावू दिल्याबद्दल हॉटेल मालकांचे आभार. या हॉटेलात आमचे हे तिसरे पुष्प. पुष्प ते पण हॉटेलात, sounds weird, म्हणून आपण ह्याला तिसरा गार-बकवास-बेचव-वडा म्हणूया. आता या हॉटेलामध्ये जी बरीच गर्दी असते, आणि ती दर्दी पण असते, अस म्हणतात.
आम्ही पहिल्यापासूनच बरेच उपदव्यापी. एकदा फिरता फिरता एका “उद्योगी मराठी माणसांच्या उत्थानासाठी आयोजित” होऊ घातलेल्या खाद्य-महोत्सवात गेलो होतो. तिथे आयोजक दादांपैकी एक दादा आमचा मित्र निघाला. त्याने विचारले तुम्ही घेणार का एखादा Food Stall चालवायला? तिथे आमच्या Madam नी आम्हाला लगेच spot-approval दिल.
क्षितिजावरती पहाट होता..... !!!
क्षितिजावरती पहाट होता अचानक मज आज ये जागृती |
गिरिशिखरांच्या वाटेवरूनि अन् पाऊले मग घेती गती ||
फिरता फिरता असा थबकलाे पाहुनी सुंदर तो देखावा |
मुग्धपणाने अनिमिष नेत्रे तृषार्तापरी पिऊनच घ्यावा ||
पर्वतराजींमधूनि हिरव्या, सूर्यबिंब ते प्रकटत जाई |
झाडे, वेली, फुले, पाखरे, आसमंतही प्रकाशित होई ||
दूर कपारीतुनि एखाद्या, ये धावत फेसाळत धार |
शांत, संयमी, गंभीरपणे अन् विस्तारीतसे तनमनी अपार ||
स्तब्ध उभ्या त्या वृक्षावरती कुणी एखादा येई पक्षी |
दोन क्षणातच अवरोहाची फुलवूनि जाई अद्भुत नक्षी ||
असाच उभा असता मी तेथे, सृष्टीचे न्याहाळीत रूप |
चाहूल लागे मजला काही, व्यक्त करी कोणी अप्रूप ||
घेऊ
Four fundamental forces बहुत 'लोकां'सी चालवणाऱ्या बलांची चतुरंग सेना
राजा विक्रमाच्या राज्यात अभूतपूर्व अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रमाच्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वातच एक भयंकर रोगाची साथ आली होती. नवा रोग, नवी लक्षणे, नवीन उपचार, नवीन लस या सर्वात जगाचं लक्ष तर होतंच पण या रोगामुळे तयार झालेल्या नवीन धोक्यांची नक्की काय काय तयारी करायची आणि धोका नक्की कुठून येईल हे सारंच कळण्यापलीकडे गेलं होतं. संपर्कात येणारा कोणता माणूस आपल्यासाठी तो रोगकारक विषाणू घेऊन येईल आणि त्याने आपण आजारी पडू हे सारंच हाताबाहेर गेलं होतं.
मिसळपाव