पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर
मी कालच हे पुस्तक वाचुन संपवले. याआधी मी सुहास शिरवळकर यांची दुनियादारी, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज व पडद्याआड ही पुस्तके वाचली आहेत. प्रामुख्याने कोर्ट रूम ड्रामा व रहस्यमयी कथा ह्या लेखनप्रकारात या लेखकाचा चांगलाच हातखंडा होता.
ह्या पुस्तकाबद्दल मला mx Player वरच्या "समांतर" नावाच्या सुहास शिरवळकरांच्याच पुस्तकापासुन प्रेरित होउन बनवलेल्या वेब सिरीज मुळे माहिती मिळाली.
समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते.
मिसळपाव