Skip to main content

मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 19/03/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करुया असा एक विचार प्रवाह येतोय. पुण्याच्या मि पा संमेलनात या बाबत उहापोह होइलच्..तुम्हाला काय वाटते.? या बाबत काय / कसे करता येईल सांगा हे साहीत्य खरोखर्च मिसळ पाव प्रकारचे आहे...पोटही भरते/ जिभेचे चोचले ही होतात / वेगवेगळ्या स्वरूपात मिळु शकते. कथा/ काव्य/ विडंबन / खादाडी / सल्ले/माहीती/चारोळ्या/ आरोळ्या सगळे प्रकार आहेत .......................साहीत्य मिसळ चरणारा साहीत्य खादाड विजुभाऊ.

"झेंडूची फुले" परंपरा

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी मंगळवार, 18/03/2008 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)यांचा "झेंडूची फुले" हा विडंबन काव्य संग्रह १९२५ साली प्रकाशित झाला.त्यानंतर अनेक कवींनी विडंबन कविता लिहिल्या आहेत.प्राचार्य राम डोके यांच्या "शतकातील विडंबन काव्य" ह्या पुस्तकात त्यापैकी काहींचा परामर्श घेण्यात आला आहे. "झेंडूची फुले" नंतर फारच मोजके विडंबन काव्य संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत.विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा.

((कुणि जाल का, सांगाल का..))

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 18/03/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना कुणि जाल का, सांगाल का..आणि कवी चतुरंगशेठ यांचे सुरेख विडंबन..(कुणि जाल का, सांगाल का..) कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कविजना ?

स्पिन अ यार्न

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 18/03/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी) मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल चला रेडी का? करू सुरुवात?

श्वानराजाधिराज

लेखक सृष्टीलावण्या यांनी मंगळवार, 18/03/2008 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
pashmina लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत. पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते.

जोधा अकबर

लेखक कोलबेर यांनी मंगळवार, 18/03/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो.