शिकवा नही किसीसे...
शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो...
रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं.
मिसळपाव