Skip to main content

हा माझा जीव तिच्या...

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 29/03/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
१ एप्रिल जसा जवळ येऊ लागला तसे मिपाकरांना कसे फुल करवे ह्या विचारत होतोच, तेव्हड्यात चतुरंगशेठचे निवेदन वाचले... आणि डोक्यात किडा आला...१ एप्रिलला अजून ४-५ दिवस बाकी होते.. पण डोक्यात आलेला किडा गप्प कसा बसून देईल.. म्हणलं सगळे जण १ एप्रिलला एप्रिल फुल करतील आपण जरा आधीच करावे..आणि मग आमचा निर्णय प्रकाशित केले.. पण धडाधड आलेल्या प्रतिसादामुळे घाबरलो..म्हणलं जस्त नको ताणायला..फुकटचा मार बसयचा तात्याचा..काय भरोसा नाही हो ह्या माणसाचा.. विडंबन लिहिणे बंद करणे म्हणजे..तात्याने शिव्या बंद करतो.. बेलाने तिरपे प्रतिसाद बंद करतो..किंवा आट्टल बेवड्याने दारू सोडतो म्हणल्या सारखे आहे..एक वेळ ते सगळे बंद पण होईल पण माझे विडंबन अशक्य आहे.. त्यामुळे जर काही लोकांना आनंद झाला असेल तर तो फार काळ टिकणार नाही त्याबद्दल त्याची क्षमा मागतो.. ह्म.. बाई, बाटली चा वापर (विडंबनात) कमी करण्याचा प्रयत्न मात्र करावाच लागेल असे दिसते.. तर समस्त फुल मिपाकरांना मनापासून धन्यवाद परवा तात्याने कुठल्या एका प्रतिसादत कविवर्य सुरेश भट यांची अप्रतिम रचना  मग माझा जीव तुझ्या ... उतरवली होती तीच रचना आमची प्रेरणा ठरली माझ्या नावा समोर नाव तुझे वाचले थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले नावाने मी उगाच हाक तिला मारली, अन् माझी 'पाय''पीट' रस्त्यातच थाटली! हा माझा जीव तिच्या लाथेने कळवळेल ! अन्‌ माझी बोंब पुऱ्या अवकाशी ह्या घुमेल ! ती निघेल लगबगीन थोडाशी बावरून; माझे पाऊल तिच्या पावलात अडखळेल ! मग स्मरेल सर्व सर्व आमचे रोमांचपर्व तो माझ्या गालांवर हात तिचा हुळहुळेल ! चुकुन कधी तू घरात लावशील सांजवात; सारे घरदार तुझे ज्योतीसम बघ जळेल ! दर्पणात पाहशील, तू ही पण दचकशील , कुणिही थोबाड तुझे पाहताच गडबडेल ! जेव्हा रात्री खुशीत एकटीच झोपशील, माझे मग भूत तुझ्या कानी बघ गुणगुणेल ! मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद; अन सारी डास जात वासाने घुसमटेल ! केशवसुमार
लेखनविषय:

वाचने 5305
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया