आपल्या मराठीमधे अनेक उपदेश कथा आहेत्...उपदेश सोप्या भाषेत कसा द्यायचा हे त्या कथा लिहीणाराला सहज जमुन जाते.
या कथा केवळ आपणाला ठाउक असणारा उपदेश सांगतात असे नव्हे. त्यातुन आपणाला माहीत नसणारा नवा उपदेश ही तेवढाच मोलाचा असु शकतो.
तो कळण्या साठी फक्त आपण आपला द्रुष्टीकोन बदलणे जरुरीचे आहे...
इथे एक गोष्ट सांगतो..पहा तुम्हाला अशा इतर गोष्टी आठवता का? तुमच्या बुद्धी साठी हा एक नवा खेळ / चॅलेन्ज समजा....
हितोपादेश या पुस्तकात एक चिमणीची आणि माकडाची गोष्ट आहे...
एक माकड पावसात भिजले होते.. त्याला थंडी वाजत होते. थंडी घालवण्यासाठी माकडाने थोडे गवत गोळा केले.
विस्तव पेटवण्यासाठी माकडाने एक काजवा पकडला आणि तो गवतावर ठेवुन ते फुंकर घालु लागले.
जवळ्च असलेल्या एका चिमणीने ते पाहीले.आणि माकडाला ती सांगु लागली...की अरे बाबा काजव्या ने विस्तव पेतत नाही.
माकडाने एकदा...दोनवेळा दुर्लक्ष केले..पण ही गोष्ट चिमणी ने तिसर्यांदा सांगितली तेंव्हा माकडाने चिडुन जाउन चिमणीलाठार मारले
हितोपदेश चिमणीला सल्ला / उपदेश देते की : मूर्खाना उपदेश करु नये.
हा उपदेश झाला चिमणी आणि माकड द्रुष्टीकोनात ठेउन... थोडा द्रुष्टीकोन व्यापक केला आणि कथे कडे काजव्याच्या द्रुष्टीकोनातुन पाहीलेतर आपल्याला एक वेगळाच उपदेश मिळतो...
काजव्याला सल्ला: तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कर्यक्षमता नीट वापरली जात नाही ...तर असे समजा की तुम्ही माकडाच्या हाताखाली काम करत आहात...( स्वतःसाठी काम करत असाल तरी हे लागु होते.)
पहा मंडळी अशा नेहमीच्या कथांमधुन नव्या कल्पना काढता येतात का?
ईसापनीति च्या तर प्रत्येक कथे मधुन असे भन्नाट अर्थ निघु शकतात. आपण ट्राय करु या.......तुमच्या कल्पना पोस्ट करा..काही तरी वेगळे अनुभवायला मिळेल.
वाचने
5886
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
माकडाच्या दृष्टीने बोध
In reply to :) by विसोबा खेचर
:))
In reply to माकडाच्या दृष्टीने बोध by धनंजय
मांसाहारी माकड?
In reply to माकडाच्या दृष्टीने बोध by धनंजय
खरं नाही!
In reply to मांसाहारी माकड? by कोलबेर
केसातल्या उवा...
In reply to खरं नाही! by पिवळा डांबिस
मांसाहारी माकड?
विहीरीत नवा सिंह पहाणार्या सिंह आणि सशाची गोष्ट ...
या गोष्टी लेखकाला निरुत्साही करणार्या आहेत.
In reply to विहीरीत नवा सिंह पहाणार्या सिंह आणि सशाची गोष्ट ... by मनापासुन
तहानलेला कावळा
हो त्याबद्दल मी लिहीणारच आहे.
तहानलेला कावळा.............
टाळ्या
In reply to तहानलेला कावळा............. by विजुभाऊ