Skip to main content

२५ जुन- १९८३

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 25/06/2008 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जुन १९८३ भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी दिवस .या दिवशी भारताने कपिल देवच्या नेतॄत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. आज या गोष्टीला २५ वर्ष पुर्ण झाली. सांघिक कामगिरी, अष्टपैलू -मेहनती खेळाडू यांच्या जोरावर भारतीय संघाने दैदिप्यमान यश संपादन केले. नुकताच त्यावेळच्या भारतीय संघातील खेळाडुंना २५ लाख रु. देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. (ज्यावेळी संघ भारतात कप जिंकुन आला त्यावेळी बोर्डाकडे खेळाडुंना द्यायला पैसे नव्हते. लता मंगेशकरांचा एक कार्यक्रम ठेवुन बोर्डाने कसेबसे १ लाख रु.

छायाचित्र परिक्षण - १

लेखक सूर्य यांनी बुधवार, 25/06/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडे छायाचित्र टिका असा उपक्रम चालु आहे. तसा इथे पण एक उपक्रम चालु करावा असे मनात आले म्हणुन छायाचित्र परिक्षण असा मिपाक्रम चालु करत आहे. चित्र आवडले की नाही. आवडले असेल तर त्याची कारणे. आवडले नसेल तर का नाही आवडले आणि कशी सुधारणा केली असती तर अजुन चांगले झाले असते याविषली चर्चा अपेक्षित आहे. आशा आहे की मि.पा. वरच्या माझ्या मित्रांना हा मिपाक्रम आवडेल. मि.पा. वर थोडेफार प्रतिसाद मी दिले असले तरीसुद्धा मि.पा. वरिल माझे हे पहिलेच पोस्ट. त्यानिमित्ताने लाल गुलाबाचे छायाचित्र इथे अपलोड करत आहे.

काय करावे कळत नव्हते

लेखक कौस्तुभ यांनी बुधवार, 25/06/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
काय करावे कळत नव्हते मागुनही मिळत नव्हते सरपटणार्या त्या आयुष्याला हक्काचे असे बिळच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते कुणी आपुले म्हणतच नव्हते शिवलेल्या त्या कावळ्याला जिवंतपणि जगणेच नव्हते -------------------------- काय करावे कळत नव्हते समोर असून दिसत नव्हते ती हाक ओठांवर पेलण्याला शब्द माझे धजत नव्हते ---------------------------- काय करावे कळत नव्हते रक्त व्यथेतून रुकत नव्हते ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे अरे घाव काय थोडे होते -- कौस्तुभ
Taxonomy upgrade extras

आणिबाणी

लेखक विकास यांनी बुधवार, 25/06/2008 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून १९७५ ला पंतप्रधान इंदीरा गांधी आणि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणिबाणी घोषित केली आणि कधी नव्हे ते प्रथमच स्वतंत्र भारताच्या इतिहासात औपचारीकरीत्या हुकूमशाही अस्तित्वात आली. त्यावेळचे अनेक किस्से खूप लहान असून देखील आठवतात - व्यक्तिगत म्हणाल तर अचानक शाळेत कुठलीतरी गाणी म्हणायची सुरवात झाली (सक्ती झाली असावी पण कळले नाही). त्या व्यतिरीक्त काहीच समजले नाही. पण एक दिवस दुर्गा भागवत आणि पुल देशपांडे हे आणिबाणीविरुद्ध कडाडल्याचे समजले.

कार्लिनबुवा आणि कर्वेबाई

लेखक धनंजय यांनी बुधवार, 25/06/2008 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
जून २२, २००८ रोजी जॉर्ज कार्लिन हे अमेरिकेतील ज्येष्ठ विनोदी कलाकार वारले. ते जिवंत असताना त्यांच्याविषयी मला काही माहीत नव्हते. पण त्यांच्या मृत्यूच्या संदर्भाने अनेक वर्तमानपत्रांत स्मरणलेख आलेत, त्यावरून एका काळच्या त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना आली. त्यांचा एका विशिष्ट विनोदी भाषणाचा उल्लेख बर्‍याच ठिकाणी आला "Seven Words You Can Never Say on Television" (दूरदर्शनवर कधीही न म्हणता येणारे सात शब्द).

रूबिक्स क्यूब

लेखक लंबूटांग यांनी बुधवार, 25/06/2008 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी solve केला आहे का? मी आत्ताच पूर्ण केला. Algorithm आणि video इथे आहे. कितीतरी वर्षांपासून प्रयत्न करत होतो. पहिले तर video बघून पण गोंधळ घातला होता. पण आत्ताच solve केला.

शादी से पहले और शादी के बाद !

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 25/06/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
शादी से पहले हाथों में हाथ लबों पर भी खूब मिठास घंटोंतक चलें फोन पे बात हर शाम उन्हें मिलने के बाद अंबर का हो रंग नीला या फिर हो घनघोर वर्षा इक छोटा, कप कॉफी का साथ देता दिवानों का… शादी होते सबकुछ बदला उनका न सिर्फ नाम बदला घर आते हैं साँझ ढले हम लिए हाथ सब्जी का थैला… बातें अब भी होती हैं घटोंतक वे चलती हैं घरखर्चा और बच्चोंकी फीस क्या जेब में अब कुछ बाकी है? ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं..
Taxonomy upgrade extras

शालूची शालीनता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/06/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
शालूला तीन बहिणी आणि दोन भाऊ. मला आठवतं गाडीअड्ड्याचे पलिकडे शालू राहायची.त्यांच्या घरी दोन गाई होत्या.त्यांचे दूध विकून शालूची आई आपल्या चिल्लापिल्लांचा संभाळ करायची. शालूच्या वडीलांत काही अर्थच नव्हता.ह्या गृहस्थाने स्वतःच्या चंगळी शिवाय कांही केलंच नाही.सकाळी उठून घरा बाहेर पडल्यावर दुपारच्या पोटातल्या भूकाग्नीला शमवायला घरी यायचे."घडता घडता घडेल ते घडेल" अशा समजूतीत राहून दिवस काढायचे.शालूची आई तर त्यांना पुरी कंटाळून गेली होती.पण करणार काय? "रांदा,वाढा आणि उष्टी काढा"हा त्यावेळचा स्त्रीयांचा आयुष्यक्रम.