Skip to main content

(आता कशाला उड्याची बात!)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 01/07/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण सामंत ह्यांचे काव्य 'आता कशाला उद्याची बात' वाचले मात्र आमचा मेंदू उड्या मारु लागला आणि एक काव्य टुणकन उडी मारुन बाहेर पडले!
Taxonomy upgrade extras

"इलो रे,इलो! कोकणातला पाऊस.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 30/06/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"शीरा मारां!ही काय पडण्याची रीत झाली?" कोकणातला पाऊस अनुभवल्या शिवाय कसा असतो तो कळणं कठीण. "नेमिची येई मग पावसाळा" हे कुणीतरी कोकणातल्या पावसालाच उद्देशून म्हटलं असणार. मृग नक्षत्र ७ जूनला लागत.शेतकऱ्या पासून लहान मुला पर्यंत एप्रिल,मेचा उन्हाळा सहन करून झाल्यावर केव्हा एकदा पाऊस येईल असं होतं.मला आठवतं त्यानुसार, मृग नक्षत्र आलं की अगदी नियमीत त्या दिवसात पाऊस यायचाच. "घडाम,घुडूम आकाशात व्हायचं.कडाड,कुडुम" होवून लाखो दिवे पेटवावेत तसं आकाशात क्षणभर सगळं उजाळून जायचं. "इलो रे!

श्‍वानशक्तीचा विजय असो!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 30/06/2008 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
;">`व्होडाफोन'चा ब्रंड अम्बसिडर असलेला आमचा नातलग. ------------------------------------------------------------ चला, गंगेत घोडं न्हालं म्हणायचं. माणूस नावाच्या "गाढवां'ना कुत्र्यांचा प्रामाणिकपणा तरी पटला. आजची "सकाळ'मधली बातमी वाचलीत? पुण्यात कुत्र्यांची मागणी दुपटीने वाढल्याची! आमच्या प्रामाणिकपणाला आत्ता कुठे भाव आलाय. बरं वाटलं. बरेच दिवस याच विचारानं अस्वस्थ होतो. डायरी सुद्धा लिहावीशी वाटत नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय घेतला जात होता.

पोचलो का आपण?

लेखक धनंजय यांनी सोमवार, 30/06/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिरजेला मध्यरात्र झाली, पाच तास लेट निघाली गोमंतक एक्स्प्रेस - आई मला झोपवलेस "उद्या सकाळी असू घरी..." उजाडले होते थोडेच तरी पहाटे डोळे किलकिले करून मी उघडले - "आई, पोचलो का आपण?" "बेळगावच आहे, बघ पण... गारवा मस्त पडला आहे. बाबांनी कुंदा आणला आहे आताच इथला ताजा ताजा जा, पटकन तोंड धू, जा..." सकाळची उन्हे झाली जून प्रवास संपत नाही अजून बाबा म्हणाले, "लोंडा जंक्शन! इथे उलटे फिरणार इंजिन..." "बाबा तुम्ही दोघे जा बघाच इंजिनाची मजा" खळ्ळकन इथून डबे सोडून तिकडे जाऊन घेतलेन जोडून. भर दुपारी घाटात गाडी थांबत सरके थोडीथोडी बोगद्यात होता अंधार दाट किती बघू पोचायची वाट? "बाबा गाडी नाहीच का पोचणार?" "ब

माझ्या घरासमोरील झाडावरचं घरटं आणि पक्षी

लेखक फुलपाखरु यांनी सोमवार, 30/06/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या घरासमोरच्या झाडावरती अमेरिचन रॉबिन पक्ष्यानी घरटं बांधलं होते. घरटं बांधण्यापासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या रुपात आहे माझ्याकडे. आपणा सर्वांना आवडतील अशी आशा आहे. घर बांधकाम चालू असताना सौ.

पडक्या घरास माझ्या

लेखक suralesandip यांनी सोमवार, 30/06/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं? अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं? हरवले सूर माझे... सांजवेळी तरीही या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं? होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं? आता उरात झरती... या वेदना सदाच्या या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं? तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं? --शब्द्सखा!
Taxonomy upgrade extras

शिपल्यातुन अलग जसा मोती.......

लेखक शितल यांनी सोमवार, 30/06/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राला माझी बाईक हवी होती, म्हणुन मी त्याला, मला बस स्टॊप वर सोडा्यला सागितले, कॊलेजला बसने जाण्याची ही पहिलीच वेळ होती,आणि बस मधील गर्दी पाहुन परत बाईक कोणालाही द्यायची नाही असे मनात ठरवुन बस मध्ये कसाबसा चढलो, डाव्या साईडच्या बस सीट वर तु बसलेली होतीस, मी तुझ्या शेजारी लटकत होतो, बस चालु झाली, बसच्या प्रवासाची सवय नसल्याने हातातील दोन नोटबुक खाली पडल्या, त्या नेमक्या त्तुझ्या आणि माझ्या पायाच्या मध्येच पडल्या, त्या उचलण्यासाठी वाकण्याचा एक दोन वेळा प्रयत्न केला पण खुप गर्दी असल्याने मला वाकता ही येत नव्हते, हे तुझ्या लक्षात आले आणि तु मला ती उचलुन हातात दिलीस, आणि देताना एक मद स्मित केले

भुंगा

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 30/06/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण भुंगा एका दिवशी बागेमध्ये भ्रमरत होता नाजुक सुंदर फुले आगळी अन थोडिशी कोळी जाळी अल्लड सावज अवचित आले भराभरा ते जाळे विणले कोळी वदला फुला आपला स्नेह निराळा सख्य निराळे त्या वेड्याला पाहुन पटकन फुलानेच एक जाळे विणले होता कोळी हरकामी तो भराभरा तो डाव मांडला उधळुन देता परागसुमने भुंगा वेडा धावत आला भुंगा वेडा असाच होता आप्तांपासुन दुरावलेला दिसता कोमल फुल आगळे वेडा भुंगा मोहित झाला झेप घेउनी मर्म स्थळावर गुज फुलाचे ऐकत बसला फुलही वदले शोककथा ते अनाघ्रात मी सुंदर होते पण जगाची तर्‍हाच न्यारी कुस्करले अन गचाळ म्हटले कोळ्याने मज घात हा केला सभोवती हे जाळे विणले तुच आगळा माझ्यासाठी पटकन उ

प्रश्न

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 30/06/2008 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
'दृष्टी तशी सृष्टी' पण दृष्टीचा अधिकारी कोण ? मन ? बुद्धि ? की शरीर ? की आणखी कुणी ? 'ज्याची दृष्टी त्याची सृष्टी' असे तर नाही ? बुद्धिचा लगाम मनाचा चॉखुर अश्व शरीररथाला वेडीवाकडी वळणं याचा अर्थ काय ? लगाम कुणा हाती ? त्याचे नाव काय ?
काळा पहाड