मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्न

काळा_पहाड · · काथ्याकूट
'दृष्टी तशी सृष्टी' पण दृष्टीचा अधिकारी कोण ? मन ? बुद्धि ? की शरीर ? की आणखी कुणी ? 'ज्याची दृष्टी त्याची सृष्टी' असे तर नाही ? बुद्धिचा लगाम मनाचा चॉखुर अश्व शरीररथाला वेडीवाकडी वळणं याचा अर्थ काय ? लगाम कुणा हाती ? त्याचे नाव काय ?
काळा पहाड

वाचने 2599 वाचनखूण प्रतिक्रिया 5

माझ्यामते आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्थात माझ्या अल्पमतिनुसार''सर्वव्यापी ,सर्व चराचरात भरुन राहिलेला,परमेश्वर''असे असावे.

काळा_पहाड 30/06/2008 - 14:17
वैशालीताई प्रतिसादासाठी धन्यवाद. माझ्यामते आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अर्थात माझ्या अल्पमतिनुसार''सर्वव्यापी ............ मलाही ह्या प्रश्नाचे निश्चित उत्तर ज्ञात नाही. म्हणुन तर 'काथ्थ्याकुट' मध्ये टाकलाय विषय. म्हटले बघुया मिपाकरांना काय वाटतेय ! मला वाटते तुमचे उत्तर देव मानणाय्रांच्या दृष्टीने बरोबर ठरावे. मात्र त्याचीही खात्री देणे कठीणच. काळा पहाड

आपले वर्णन वाचून एका श्लोकाची ( बहुतेक गीतेतल्या ) आठवण आली . त्यात असे म्हटलयं की पंचेन्द्रिये ही पाच घोड्यांप्रमाणे असून त्याचा लगामधारी सारथी असते मन. मनोबुद्धीअहंकार या सुक्ष्म व पाच बाह्य इन्द्रिया अशा या रथ यंत्रणेचा सम्राट असतो आत्मा ..

In reply to by अभिरत भिरभि-या

हेरंब 04/07/2008 - 22:10
मला ही या प्रश्नाचे उत्तर 'आत्मा' हेच असावे. आणि आत्म्याचा मालक 'परमात्मा.

विसोबा खेचर 05/07/2008 - 19:29
जाऊ दे रे काळ्या! फार विचार नको करू! :) तात्या. -- "न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत. मग त्या भांगेच्या असोत वा अध्यात्माच्या!" (इति काकाजी, नाटक : तुझे आहे तुजपाशी)