Skip to main content

१६

लेखक अवन यांनी मंगळवार, 22/07/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
१६ हे काय आहे? हा सरकारला टिकून राहण्यासाठी हवा असलेला कोणताही आकडा नाही किंवा गझलांमधली "बाली उमर" नाही. तर आजपासून १६दिवसांनी चीन मध्ये ऑलिंपिक सुरू होणार आहे. चीन मध्ये प्रथमच एक आंतरराष्ट्रीय सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. चीन १९८४ मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिक सामील झाला. त्यावेळी चीनने ३२ पदके मिळवली. तर मागच्या २००४च्या ऑलिंपिक मध्ये, ६३ पदके मिळवून दुसरे स्थान पटकावले. २० वर्षातली ही चीनची कामगिरी. या उलट भारताची स्थिती आहे.

विनयभंग

लेखक शितल यांनी मंगळवार, 22/07/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
विनयभंग Assault or criminal force to woman with intent to outrage her modesty. Whoever assaults or uses criminal force to any woman, intending to outrage or knowing it to be likely that he will thereby outrage her modesty, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine, or with both. भारतीय दंड विधान ३५४ नुसार विनयभंग म्हणजे काय?आणि त्याला कोणती शिक्षा आहे ?त्याबद्दलची कायद्याची परिभाषा अशी आहे... विनयभंगः महिलेला लज्जा उप्तन्न होईल ह्या हेतुने केलेला अत्याचार व बळाचा बेकायदा वापर. शिक्षा: जो कोणी ,जाणता अथवा अजाणता, महिलेवर अ

भूजलपातळी आणि त्याचे परिणाम

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 22/07/2008 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
भूजलपातळीवर आज लोकसत्तामध्ये आलेला लेख वाचून मला पडलेले प्रश्न परत डोके वर काढू लागले. त्यात लिहिलेल्या काही मुद्द्यांवर मला जास्त माहिती नसल्याने मला तो पूर्णपणे समजून घेता आला नाही. तसा तो समजून घेता यावा आणि त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी यासाठी हा चर्चाप्रस्ताव. १. शिवकालीन पाणी योजना म्हणजे नक्की काय? आणि ती कशी अंमलात आणतात? २. 'भूजल पातळी खालावलेल्या गावांमध्ये बोअरवेल, विहिरी खोल करणे, हातपंपांची दुरूस्ती अशी ही कामे करण्यात येणार आहेत. ' हे हास्यास्पदपणे गंभीर वाटत नाही का?

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

लेखक चिन्या१९८५ यांनी मंगळवार, 22/07/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्. समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ त

( अटी मान्य केला सर्व ह्या, )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 22/07/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
( अटी मान्य केला सर्व ह्या, ) आज काँग्रेस प्रणीत आघाडी सरकार विश्वास दर्शक ठरावास सामोरे जात आहे. बहुमतांसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवताना मनमोहन / सोनियाजी यांच्या मनातील ही भावना. चाल : सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ? ( विशेष मदत : केसु गुरुजी ) ------------------------------------------------------- अटी मान्य केला सर्व ह्या, पाठी उभा राहशील का? ॥धृ.
Taxonomy upgrade extras

(तनःशांती!)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;) तनःशांतीचा शोध घेत होतो रात्रंदिवस 'फिटनेस'वर शोधले, 'वेटलॉस'वर आलो जाऊन 'बुलवर्कर' धुंडाळले 'टर्बो बॅग' काढली बुकलून 'केक' पाहिले बदलून 'लो कॅलरी'ही शोधत राहिलो 'ट्रेडमिल' झाले फिरवून 'स्पिनिंग' करत फिरलो निवांत क्षणी एका लकाकले डोळे, फिटली भ्रांती 'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा चतुरंग

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/07/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
निवृत्तीनाथ केशवसुमारास... विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या `कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे? कसल्या प्रतिमा? कसले जाळे?
Taxonomy upgrade extras

(निवृत्ती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/07/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?