Skip to main content

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 13/08/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे. स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं? गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

लेखक बिनडोक बनी यांनी बुधवार, 13/08/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये आम्ही वैवाही भाबडे. तुम्हा रुचेल का हो हे माझे मोडके तंगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो बायको घरात आम्हा म्हणते फावडे. जन्म स्वैपाकात गेला, अमुचे भांड्यांशी वाकडे. जशी समजून चाले ती आम्हांसी बोकडे. जरा चालवूद्या हात, जुळवितो माझे शब्द. लव्हमॅरेज अमुची कथा अगदिच नाही निर्बुद्ध. - बिनडोक बनी प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 13/08/2008 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये आम्ही अज्ञानी भाबडे. तुम्हा रुचतील का हो माझे शब्द हे रांगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो ज्ञान मेळ्यात या आम्हा करता नागडे. जन्म अंधारात गेला, अमुचे सूर्याशी वाकडे. जरा समजून घ्यावे हेची तुम्हासी साकडे. जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध.

(वय साठावं लागलं की)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 13/08/2008 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा!

सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सिन्थॉल दादास, निरमाताईचा, सप्रेम नमस्कार वि.वि. तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला" वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने, "फेअरग्लोला " मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो. बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं. "सर्फ" मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी. मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या, "साबण जमातीची" दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.

माझंही एक चित्रं..

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळी..नमस्कार! ईथे बरीच चित्र बघितली, माझंही एक चित्रं टाकत आहे.. (नविन "कलादालन" काही सापडलं नाही बुवा) या चित्राचं एक मोठ्ठं पेंटिंग बघितलं आणि बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे. घरच्यांकडुन नेहामीच खरपुस समिक्षा व्ह्यायची चित्रांची, तेव्हा तुमच्याकडुन पण खरया आणि सुचक समिक्षेची अपेक्षा करते. :)

राम राम मंडळी...

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं? दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां... तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.." आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :) चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...