Skip to main content

राख.....

लेखक किरण मल्लाव यांनी बुधवार, 10/09/2008 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
राख..... नाकात कापुस घालु नका, संगतीने माझ्या चालु नका.... प्राण माझे कधीच गमवले, परत मला मारु नका..... रडण माझ नाही ऍकल, आता तुम्ही रडु नका.... लग्नात मी सजलो नव्हतो, सरणावर मला सजवु नका.... संकटात कोणी नाही आले, बघ्यांची गर्दी करु नका...... जीव गेला पाणी-पाणी करता, दोन-दोन घोट पाजु नका..... देवाला कधी पुजले का तुम्ही...? राम नाम तोंडात घेऊ नका.... कोणी एक बोट नाही दिले, चार-चार खांदे देऊ नका..... शरीर जळुन गेले माझे, उरलेली राख जाळु नका...... किरण रामचंद्र मल्लाव..08 @धन्यवाद........!
Taxonomy upgrade extras

तूझे येणे.......

लेखक नीता यांनी बुधवार, 10/09/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
तु आयुष्यात आलास श्रावणधारा सारखा आषाढ्घनासम काळोख्या मनात पेरलेस चमचमते प्रीतिचे थेंब आता तु नसलास तरी... त्याच प्रीतीचे अकुंर आलेत मनभरुन कधी कधी वहातात डोळ्यातून अश्रुची फुले होउन..... नीता
Taxonomy upgrade extras

टोचणी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 10/09/2008 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ३५ वर्ष ही अपराधीपणाची भावना काहीकेल्या पाठ सोडत नाही. नकळत झालेली चूक. वय पण लहान. आई मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने के.ई.एम. मध्ये दाखल होती. आईचा छोटा म्हणुन माझी ड्युटी कायम हॉस्पिटलमध्ये. त्या २१ दिवसात डॉक्टर ह्या संस्थेवरचा विश्वास उडाला. शिकाउ मंड्ळीनी केलेले आईच्या देहाचे हाल याची देहा याची डोळा बघितले. आजही तो एक अविभाज्य भाग असतो डॉक्टर होण्याचा हे माहित असुन राग डोक्यातुन जात नाही. आई जाण्यापुर्वी चार दिवस -रेसिडेन्ट डॉक्टर तपासुन गेले. एक्स-रे आणि इतर तपासणी करता आईला वॉर्डातुन हलवायचे होते. आईला सारखी ग्लानी येत होती.

परवानगी

लेखक वडा-पाव यांनी बुधवार, 10/09/2008 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
मि माझा नविन ब्लाग तयार केला आहे प्रयत्न करित आहे. येथील साहित्य काहिहि बदल न करता माझ्या ब्लाग वर प्रकाशित केले तर चालेल का?

अमेरिकेतील आमच्या घरच्या गौरी..

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 10/09/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबाद प्रमाणे यंदाही आमच्या घरी (बे एरिया, फ्रिमाँट) येथे रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला. गौरीचा सगळा स्वयंपाक मी व आमच्या सौं. नी सकाळी ५:०० वाजता ऊठून सोवळ्यात केला होता. मिपातर्फे आमचे जुने मित्र 'एक' सहकुटुंब हजर होते. त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे. सध्या फक्त गौरींचीच छायाचित्रे देत आहे. जमल्यास दर्शनाला आलेल्या ईतर मित्रांची सुध्दा टाकीन... आमच्या सौ.

कधी रे येशील तू... अनामिका....

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 10/09/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....
Taxonomy upgrade extras

वर्षा भोसले - आशा भोसले यांच्या मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

लेखक वेदनयन यांनी बुधवार, 10/09/2008 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतिच मटा वर ईथे बातमी वाचली. सुन्न झालो. असे का व्हावे - कारण काय? एके काळी वर्षा रिडिफ वर लिहीत असत; ते मला खुप आवडे. पण गेल्या पाच-एक वर्षात त्या काय करीत ह्याचा पत्ता नाही. कुणाला माहित असल्यास जरुर सांगा. लवकर बर्‍या होत हिच ईश्वरचरणी प्रार्थना. रोहित

मिसळपाव कट्टा - सॅन होजे/सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरिया

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 10/09/2008 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सॅन होजे-सॅन फ्रान्सिस्को व परिसर बे एरियामधील मिसळपाव सभासदांचा कट्टा आयोजित करण्याचा मानस आहे. सर्किटराव व एक शी बोलणे झाले असून २७ सप्टेंबर २००८ अशी प्रस्तावित तारीख आहे. वेळ - स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ४ ते ७ (प्रस्तावित) प्रस्तुत प्रस्तावाचे/काथ्याकुटाचे उद्देश पुढीलप्रमाणे - ०. कट्ट्याची तारीख आणि वेळ सोईची नसल्यास पर्यायी तारीख आणि वेळ सुचवणे. जास्तीत जास्त सहभागींच्या सोईनुसार अंतिम तारीख आणि वेळ निश्चित करणे. सध्या उपलब्ध माहितीनुसार वरील तारीख आणि वेळ प्रस्तावित केली गेली आहे. १. कट्टा कोठे भरवावा, याबाबत विचारविनिमय. इच्छुक सहभागींनी सूचना केल्यास उत्तम.

मिरचीचे लोणचे

लेखक चकली यांनी बुधवार, 10/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
पानगी आणि मिरचीच्या लोणच्याची चर्चा वाचली आणि मिरचीच्या लोणच्याची कृती लिहावी वाटले.