Skip to main content

सालसा कसा करावा?

सालसा कसा करावा?

Published on 10/09/2008 - 18:22 प्रकाशित मुखपृष्ठ
जाणकार माहिती सचित्र देतील तर बर होईल.

याद्या 6572
प्रतिक्रिया 20

नावाच्या पदार्थाची कृती हवी आहे? का सालसा नावाच्या नृत्याची की सालसा संगीताची माहिती? (कसा करावा असे विचारल्याने संगीत नसावे) फोटो दोन्हींचे नाहीत. पदार्थाच्या ४-५ कृती सांगू शकेन. संगीत-नृत्याबाबत तोंड बंद!

In reply to by प्रियाली

चला या निमित्ताने माहितीची देवाणघेवाण झाली !! सालसा नावाचा पदार्थ असतो हेच्च आम्हाला नव्हते माहित.

In reply to by प्रियाली

>>सल्सा म्हणजे स्पॅनिश भाषेतला सॉस किंवा मराठीतली चटणी. अच्छा .. बरं बरं !! चटणी व्हय ! म्हणजे खुप प्रकार असतील. बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ?? - आंद्या बादरायण

In reply to by आनंदयात्री

बर मग नाचातल्या सालस्यात पायावर पाय पडुन पायांची चटणी होते म्हणुन त्याला सालसा नाव दिले का ??
न्हाय न्हाय बहुधा संगीत आणि नृत्य हे हॉट अँड स्पाईसी (चटकदार) असावेत चटणीसारखे. ;) (व्युत्पत्तीकार) प्रियाली

In reply to by प्रियाली

आंद्या, तू नाचताना, तुझा पाय पडला तर चटणी म्हणून तुझी व्युत्पत्ती बरोबर आणि प्रियाली असेल तर तिचं म्हणणं बरोबर, कसं? (ह.घ्या) :-) (संदर्भाप्रमाणे अर्थ लावणारी) छोटी/अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तु गेली आता प्रियालीच्या हिटलिस्ट वर. अग आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !! अब तेरा क्या होगा अदिती ?? यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी !! (सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)

In reply to by आनंदयात्री

आख्ख्या आंतरजालावर तिला लोक साधे प्रियालीताई म्हणायला सुद्धा चळाचळा कापतात अन तु तर हॉट अन स्पाईसी म्हटलेस !! मी तिला प्रियालीताईच म्हणते, आणि मी तिला नाही, तिच्या व्युत्पत्तीला म्हटलं, हॉट अन स्पायसी! आणि कोण म्हणतं ते महत्त्वाचं असतं का नाही? यहा ५० - ५० कोस दुरके संकेतस्थळोपे जब मारामारी रुकती नही तब प्रशासक बोलते है, बच्चो चुप हो जाओ नही तो प्रियाली आ जायेगी!! मग आहेच ती भारी! ताई आहे ती माझी! (सुना है मुर्तजा अरझाई के आखोमे मौत रेहती है - चॉकलेट)' ये जरा मराठीत सांगणार का वो, भौ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली तुझ्या खरडवहीतल्या स्वागताच्या मजकुरासाठी सातवा पॉइंट मिळाला ७. गळेपडु बहिणींचा मला तिटकारा आहे. ;)

In reply to by आनंदयात्री

नाही, सातवा पॉईंट असा की फालतू लोकांकडे मी लक्ष देत नाही! पण तुला काय रे त्याचं, तिला काय लिहायचं ते ती बघेल? तू काय तिचा आशिश्टंट का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझा हितचिंतक !!

राजा विक्रमला बोलवावे अन त्याच्याबरोबर विक्रम-वेताळ सालसा करावा !!

सालसा या पदार्थाच्या कृती बद्दल आपण चौकशी करत असाल तर- http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये वसुंधरा पर्वते यांचा लेख आला आहे तो पहावा. रुचीपालट या सदरात 'चवदार व बहुपयोगी सालसा' असा लेख आहे. त्या लेखाचा दुवा मी तयार करु शकलो नाही. साप्ताहिक सकाळच्या लेखाचा दुवा कसा करावा? --लिखाळ.

In reply to by लिखाळ

हा घ्या दुवा. लिखाळ, सकाळवर दुवे घेताना दुव्यावर उजव्या बटणाच्या टिचकीतून 'कॉपी शॉर्टकट' हा पर्याय निवडावा.

In reply to by वेताळ

दुव्याबद्दल धन्यवाद. बर झालं दुवा दिला नाही तर सालसा कसा करावा? - बेभान होउन! करायची कृती - एक नर घ्यावा व एक नार घ्यावी. नार ही नरापेक्षा कमी वजनदार असावी की हाताळताना सोपे जावे. मग दोन नर घेउन चालेल का असे कोणि विचारल्यास ही पारंपारिक पाकृ असल्याने एक नर व नार घेउन आहे. बाकी कोणास दोन नार असलेली पाकृ माहीत असेल तर जरुन फोटो द्यावा असे काहीसे लिहावे का असे ठरवत होतो... ;-)

सकाळमधील लेख आवडला.लिखाळ आणि देवदत्त धन्यवाद. स्वाती