Skip to main content

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व भाग १

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 11/09/2008 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी... मी आज तुम्हा सर्वांसोबत माझे सवाई गंधर्व महोत्सवाचे फोटो शेअर करु इच्छीते..... पंडीत जसराजजी.. मला यांचे फोटो काढायला नेहमीच आवडतं कारण यांचा चेहरा फार फोटोजेनीक आहे...

डाम्बीसपणा

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 11/09/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या ब-याच तज्ञांकडुन गझल या विषयावर बरीच काही माहिती मिळाली आहे. गझलेच्या दोन कडव्यांमधे काही संबन्ध असलाच पाहिजे असे नाही हे एक म्हणणे आहे प्रत्येक कडवे /शेर हा स्वतन्त्र लिहिले जाते दोन कडव्यांत / शेरांत एकमेकाना जोडणारा अर्थाचा प्रवाह एकसंध वाहिलाच पाहिजे असा आग्रह नसावा. हा अर्थात मी त्या चर्चेतुन माझ्या मगदुरानुसार काढलेला अर्थ. थोडा प्रयत्न केला आहे तसेच काहिबाही लिहिण्याचा.

"मुघलीस्तान"ह्या होऊ घातलेल्या देशाबद्द्ल काही माहीती आहे का?

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 11/09/2008 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान व बांग्लादेश यांच्या सद्य कारावायां बाबत माहीती पुर्ण लेख....

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 11/09/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच.

टीव्ही वाहिन्यांतील पाहिलेले बदल

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

जमवायचं एवढं?

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 10/09/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कुटुंब सदस्यांनो, http://www.misalpav.com/node/3405 वेंगुर्ल्याचं वर्णन वाचून तुम्हालाही तिथे जावंसं वाटलं असेल, ना? मी दस्तुरखुद्द रत्नागिरीचा असलो, तरी अजून वेंगुर्ल्याला गेलेलो नाही. बऱ्याचदा असंच होतं. एखाद्या सुंदर ठिकाणाचं वर्णन वाचून आपल्याला तिथे जावंसं वाटतं, पण जाणं जमत नाही. अनेकदा सोबत कुणी नसतं, ग्रुप जमत नाही, अनेक भानगडी. मिपा च्या माध्यमातून हे जमवायचं? निदान पुण्यातल्या मिपा सदस्यांसाठी तरी हे करता येईल. एखादं जवळचं ठिकाण, उदा. श्री.ना. पेंडशांचं दापोली निवडायचं. तिथे पाहण्यासारखी अनेक ठिकाणं जवळपास आहेत.

आपण प्रत्येक जण आपआपल्यापरीनेच वेगळे असतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 10/09/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी प्रो.देसायांच्या घरी गेलो होतो.उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचा नातू पण घरी आला होता.बरोबर त्याचा रुम-मेट पण थोडे दिवस त्याच्या बरोबर राहायला पण आला होता.माझी त्याच्याशी ओळख झाल्यावर आमच्या थोड्या गप्पा पण झाल्या.त्याच्याशी खूप बोलावसं वाटण्यासारखा त्याचा स्वभाव वाटला.मी त्याला गप्पा मारायला आपण तळ्यावर भेटू असं सांगून घरी परतलो. संध्याकाळी तळ्यावर त्याला एकटाच येताना पाहिलं.जवळ आल्यावर म्हणाला, "भाऊसाहेब आणि सर्व मंडळी देवळात गेली आहेत.मला पण बोलवत होती.पण मी तुम्हाला अगोदरच तळ्यावर भेटू म्हणून प्रॉमीझ दिलं होतं,म्हणून मी देवळात न जाता तुम्हालाच भेटायचं ठरवलं. सकाळच्याच गप्पाचा

आत्मक्लेश

लेखक नंदकिशोर साळ्वे यांनी बुधवार, 10/09/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतात फुलायचे, श्रावणात झुलायचे असं आपलं ठरलं होतं, पण ग्रीष्मात वाळायचे, शिशीरात गळायचे यातच आयुष्य सरलं होतं.

आमटी - नविन प्रकार

लेखक नीता यांनी बुधवार, 10/09/2008 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
१ वाटी - तूरडाळ, १/२ वाटी साडंगे ( हे बहुधा उन्हाळकामात बनवले जातात्...सगळी कडधान्ये असतात) चिंच, गूळ, तेल,जीरं, मोहरी,हिंग्,हळद ( फोड्णी साठी) कृति - नेहमी आमटी साठी घेतो तशी डाळ शिजवुन घेणे. शिजताना थोडेसे तेल आणि हळद टाकावी . ( आयुर्वेदानुसार यामुळे डाळीचा वातुळ पणा कमी होतो.) तेल तापवुन मोहरी, जीरं,हिंग आणि हळद टाकावी. कढिपात्ता टाकावा. फोडाणीत साडंगे परतुन घ्यावे. झाकण ठेवुन जरा वाफ आणावी. वरून शिजलेलि डाळ घालावी. उकळी आल्यावर चिंच , गुळ घालावा आणि गोडा मसाला टाकावा.... सांडगे शिजु द्यावे.... चविपुरते मीठ आणी लाल ति़खट टाकायला विसरु नये. मस्त गरम भाताबरोबर आस्वाद घ्यावा.