मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व भाग १

मिंटी · · कलादालन
नमस्कार मंडळी... मी आज तुम्हा सर्वांसोबत माझे सवाई गंधर्व महोत्सवाचे फोटो शेअर करु इच्छीते..... पंडीत जसराजजी.. मला यांचे फोटो काढायला नेहमीच आवडतं कारण यांचा चेहरा फार फोटोजेनीक आहे... ........................................................ पंडीत शिवकुमार शर्माजी अतिशय देखणं व्यक्तीमत्व पंडीत भिमसेन जोशी ( हा फोटो मी काढलेल नाही...माझ्या भावाने काढलेला आहे) उर्वरीत फोटो नंतर टाकेन..... आशा आहे तुम्हाला फोटो आवडतील.... धन्यवाद.... :)
लेखनविषय:

वाचने 6229 वाचनखूण प्रतिक्रिया 16

आनंदयात्री 11/09/2008 - 11:23
मिंटे काय सुरेख फोटो काढलेत गं. ४ नंबरचा तर फारच छान आलाय !

स्वाती दिनेश 11/09/2008 - 11:27
मस्त.. यात्रीसारखाच मलाही ४ नंचा फोटो जास्त आवडला. स्वाती

विसोबा खेचर 11/09/2008 - 11:29
सुरवातीचेच काही फोटू आमच्या नावडत्या गायकाचे?! :) सवाईगंधर्व महोत्सवाच्या अन् भारतीय अभिजात संगीताच्या अध्वर्यूंचे काही फोटू बघायला मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती! असो... चांगला उपक्रम! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 11/09/2008 - 11:50
असेच म्हणतो --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

मृगनयनी 11/09/2008 - 11:31
सुंदर ! गं मिंटे...... तुला गायनाची आवड आहे काय? तु सिंगर तर नव्हे? :-?

मिंटी 11/09/2008 - 11:33
धन्यवाद..... तात्या तसं बघायला गेलं तर मलाही जसराज जी आवडत नाहीत पण त्यांचे फोटो काढायला मात्र आवडतं कारण त्यांचे फोटो खुप मस्त येतात... पण तुमच्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद... :) मी पुढचे फोटो लवकरच टाकेन..

धमाल मुलगा 11/09/2008 - 11:51
क्या बात है| जियो मिंटी, जियो!!! मस्त फोटो... क्लोजअप्सपण सही आलेत :) पण, च्यामारी, नुसते फोटो पाहुन काय मजा येणार? तिथे हजर असणं हेच खरं सुख :) (पुढच्या सवाईचे फोटो डब्ल्यू १३० ने काढणार ना? :) )

प्रमोद देव 11/09/2008 - 12:43
मिंटे आवडल्या गं भावमुद्रा! तुझा हात चांगला चालतो....छायाचित्रणात! :) ह्या छायाचित्रात भीमसेनजी प्रवचन करणारे एखादे बुवा किंवा महाराज वाटताहेत. त्यांची जुनी एखादी गातानाची प्रसन्न भावमुद्रा असलेली छबी असेल तर चढव इथे.

विसोबा खेचर 11/09/2008 - 12:33
हम्म! आता कसं! आमच्या अण्णांच्या फोटूमुळे आता या लेखाला शोभा आली! आपला, (अण्णांचा भक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 11/09/2008 - 12:36
:( काय थकलेत हो आण्णा आता :( बाप रे, पाहुन कसंसंच झालं.

In reply to by विसोबा खेचर

मिंटी 11/09/2008 - 12:39
तात्या आणखी काही फोटो टाकेनच आण्णांचे लवकरच... (तुमच्या सारखीच आण्णांची भक्त ) मिंटी

स्वाती राजेश 11/09/2008 - 16:36
तुझी फोटोग्राफी वाखाणण्याजोगी आहे... छान फोटो आलेत..क्लोज-अप तर अप्रतिम....त्यामुळे चेहर्‍यावरचे भाव दिसतात...किती मस्त आनंद घेत असावेत संगीताचा.....:)

ऋषिकेश 11/09/2008 - 16:47
सगळे फोटो सपष्ट आले आहेत. आवडले. पं शिवकुमार शर्मा यांच्या संबंधीत एक आठवण झाली. दोनेक वर्षांपूर्वी डोंबिवलीमधे चतुरंगच्या रंगसंमेलनात त्यांचे वादन होते. फ्लड लाईट मुळे त्यांच्या भोवती बरेच किडे, पाकोळ्या फिरू लागल्या. म्हणून त्यांनी स्टेजवरचे दिवे मालवायला सांगितले. तरीही हा त्रास थांबेना. शेवटी त्यांनी संतूराच्या दोन्ही काड्या एकाच हातात धरल्या व एका हाताने किडे हाकलत वाजवू लागले. तरीही डोळे बंद करून ऐकले असते तर कळले नसते की काहि व्यत्यय आला आहे. तिथेच मी त्यांच्या वादनाला सलाम ठोकला. नंतर पूर्ण रात्र झाली तसे किडे गेले आणि मैफल रंगतच गेली. बाकी थकलेल्या अण्णाना पाहून वाईट वाटले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

श्रीमंत दामोदर पंत 11/09/2008 - 17:57
वा !!!!!!!!!!!! मस्त आहेत ग फोटो...... आपल्याकडे आण ना याच्या कॉपी...........

संदीप चित्रे 11/09/2008 - 22:10
सवाई गंधर्वच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ! धन्स मिंटी (-- एक खारोटी का ? महाराष्ट्र बँकेच्या जाहिरातीतली ! ;) ) (अवांतरः आमचे फोटो चांगले काढून दाखव तर मानलं !!!) :)

यशोधरा 11/09/2008 - 22:15
छान आहेत गं सगळेच फोटो मिंटी, खूप आवडले. पं भीमसेन जोशी किती थकलेत.... :(