आमटी - नविन प्रकार
१ वाटी - तूरडाळ,
१/२ वाटी साडंगे ( हे बहुधा उन्हाळकामात बनवले जातात्...सगळी कडधान्ये असतात)
चिंच, गूळ,
तेल,जीरं, मोहरी,हिंग्,हळद ( फोड्णी साठी)
कृति -
नेहमी आमटी साठी घेतो तशी डाळ शिजवुन घेणे.
शिजताना थोडेसे तेल आणि हळद टाकावी . ( आयुर्वेदानुसार यामुळे डाळीचा वातुळ पणा कमी होतो.)
तेल तापवुन मोहरी, जीरं,हिंग आणि हळद टाकावी. कढिपात्ता टाकावा.
फोडाणीत साडंगे परतुन घ्यावे. झाकण ठेवुन जरा वाफ आणावी.
वरून शिजलेलि डाळ घालावी.
उकळी आल्यावर चिंच , गुळ घालावा आणि गोडा मसाला टाकावा....
सांडगे शिजु द्यावे....
चविपुरते मीठ आणी लाल ति़खट टाकायला विसरु नये.
मस्त गरम भाताबरोबर आस्वाद घ्यावा.
याद्या
5033
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
नक्की करून बघीन.
आमच्या इथे मिळतात असे सांडगे..
सांडग्यां
केली हो!