माय जगो मावशी पण जगो
समुपदेशनाचे धडे लहान पणीच मिळाले. आई आणि मावशीकडुन. आई अशिक्षित मावशी बर्या पैकी शिकलेली. दोघी मध्ये डावे उजवे करणे कठीण. घराण्यातले सर्व क्लिष्ट प्रश्नसोडव्ण्यात दोघी एकदम पटाइत. मी लहान असल्यामुळे मी आजुबाजुला रहायला परवानगी. मला काही कळत नाही असे त्याना वाटायचे. चंद्रकांत काकोड्कर ९ व्या वर्षी पचवलेला मी. कधी कधी मावशीला संशय यायचा. तेंव्हा ती सांकेतिक भाषा वापरायची. पण ते पण कळायचे.
मावशी स्त्री मुक्ती चळ्वळीची चेयर पर्सन टाइपची. अत्यंत स्फोटक. तेवढीच प्रेमळ. माझ्यावर खुप प्रेम. कारण तीची ३ मुले अमेरिकेत सेट्ल झालेली. कुठ्लेही पाश नसल्यामुळे कोणालाही मदत करायला मोकळी.
मिसळपाव

मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)