Skip to main content

गांधी जयंति निमित्ताने (आम्हि कपाळ करंटे महात्माजींची क्षमा मागतो)

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 02/10/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मी हि भोंदू तुहि भोंदू आपण दोघे भोंदू जे जे नाहित भोंदू ते आहेत सारे गांडू बोले त्यैसा चाले तयाचि कापून टाकु पावूले सत्याचे जे उदघोष करिती तयांचे दाबून टाकु गळे गांधी जरीका पुन्हा जन्मला आम्हि मारून टाकु त्याला कार्य तुझेरे संपले केव्हाच पुन्हा कशाला आला..........? परतन्त्र होईल देश जेव्हा हा बोलवु तुला रे पुन्हा सत्य अहिंसा आहे येथे सध्या तरी रे गुन्हा.....!
Taxonomy upgrade extras

महात्मा गांधी जयंती

लेखक छोटुली यांनी गुरुवार, 02/10/2008 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज दोन ऑक्टोबर .महात्मा गांधी जयंती.त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे राष्ट्रपिता मा.महात्मा गांधी यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम . रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मति दे भगवान ! वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीडपराई जाने रे !

अमेरिकेची नवी वाट

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे.

अल्फाराटा

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 02/10/2008 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी कांही दिवसासाठी अमेरिकेत अल्फाराटा इथे आलो आहे. कोणी मिसळपावप्रेमी इथे जवळपास अहेत काय ?

मिपा कडून खेळाडूस मदत - प्रस्ताव

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 01/10/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ही बातमी वाचली. चार वेळा हिंदुस्तान श्री व दोन वेळा महाराष्ट्र श्री पटकवलेल्या सुहास खामगावकर या मराठमोळ्या पैलवानाला खुराकाला पैसे नाहीत. अशा बातम्या वाचल्या की वेदना होतात. जगात देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता असणारे असे खेळाडू जागतीक स्पर्धे पर्यंत सुद्धा पोचत नाहीत हे आपले दुर्दैव. आपल्या मुर्दाड व भ्रष्ट राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण सुद्धा आपला खारीचा वाटा उचलावा असा विचार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या पैलवानाने नाव कमावले तर... किती समाधान मिळेल ना आपल्याला!

आपापले जग.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 01/10/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे. काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा. ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे. आता विषय प्रवेश. २५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग. स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा. अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग. माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना? मी : हो, माहित आहे. तो : अरे त्याचा काडीमोड झाला. मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.

सलामत हरी राया!!!

लेखक स्वप्ना हसमनीस यांनी बुधवार, 01/10/2008 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

बुद्धिबळाच्या युद्धपटावर!

लेखक सचिन जाधव यांनी बुधवार, 01/10/2008 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धिबळाच्या युद्धपटावर, एक प्याद निमुटपने लढत होत..... स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. समोर येना-या प्रत्येक सन्कटाला, ते धैर्याने समोर जात होत, स्वबळावर स्वहिमतीवर, एक एक घर ते पुढ सरकत होत. लढता लढता ...लढता लढता, पोहचल शेवटच्या घरट्यात, तेव्हा ते प्याद एक वझिर होत, स्वबळावर त्यान आता राजालाही, नमवल होत. पण्.........पण ???? खेळ सन्पला तेव्हा...... ते प्याद मात्र एक प्यादच होत, अण पुन्हा एकदा , लढण्यासाठी सज्ज होत.........पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होत.