Skip to main content

चिंतन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 15/10/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड चिंतन चालू असे चित्ति त्याला नाही मरण मेल्याविना नैसर्गिक आहे विचारांचे येणे त्याला थांबवया बहाणे शोधू नका येउदेत बापुडे कितीते विचार त्याचे प्रकार पाहू चित्ति बुद्ध म्हणे जना रहा अखंड सवधान कराहो अवलोकन स्वचित्ताचे....!
Taxonomy upgrade extras

पास ऑन

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 15/10/2008 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू न सपनाचे गावान शिराचू तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा न आभालान फीराचा अमिताभ बच्चनसारका सांगाचा 'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी' माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा 'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी ' बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता नजर आढ्याला लावून जागीत व्हता त्याचे डोल्यान बगीतला न

कॅनव्हास

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 15/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो,चित्र काढतो.
हृदयनाथांच्या आवाजात अशी सुंदर पदं ऐकतांना हलकेच डोळा लागावा अन कानावर पडणारे अमुर्त शब्द मुर्त व्हायला लागावेत. मानसीचा चित्रकार खरोखरीच अवतरावा अन त्याने स्वच्छ निरभ्र आकाशालाच त्याचा कॅनव्हास बनवावा. कल्पनेच्या कुंचल्याने सरासर त्याने हात चालवायला सुरुवात करावी अन कल्पनाचित्रांची जादुगरी त्या कॅनव्हासवर उतरु लागावी. साधी साधीशी रानफुले कुंचल्याच्या फराट्यातुन साकारु लागावीत, कधी नितळ वहाणारे पाणी दिसावे तर कधी उमटावे जाळीदार झालेले एखादे पिंपळाचे पान.

म्हणे कोण मागे आले...

लेखक आगाऊ कार्टा यांनी बुधवार, 15/10/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
जोशी मास्तर हे गावातले एक बुजुर्ग आणि सदा हसतमुख व्यक्तीमत्व. आता मास्तर म्हणायाला ते काही शाळेवर शिक्षक नव्हते काही. ते होते गावातल्या पोस्टात पोस्टमास्तर. हजार बाराशे वस्तीचं ते छोटसं गाव त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाशी मास्तरांचा नित्यनेमाने संबंध येत असे. कोणालाही चटकन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे गावात त्यांना खूप मान होता. मास्तर नोकरीला लागले ते याच गावात. पत्नी आणि दोन मुले हा त्यांचा संसार. मुले गावातच लहानाची मोठी झाली आणि उत्तम पदवीधर होऊन बाहेर मोठ्या शहरात नोकरीला गेली. दोन चांगल्या सुस्वरुप आणि मुख्य म्हणजे सुस्वभावी मुली बघून मास्तरांनी दोघाही मुलांची लग्ने लावून दिली.

कोलंबीची आमटी

लेखक ललिता यांनी बुधवार, 15/10/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही सारस्वत पध्दतीची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून करतात... एक वेगळी चव! ४०० ग्रॅम सोललेली कोलंबी (धुऊन घ्यावी) अर्ध्या नारळाचे खोबरे १ वाटी नारळाचे घट्ट दूध १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला १ शेवग्याची शेंग (४'' चे तुकडे करावे) कैरीचा तुकडा - नाहीतर बोराएवढी चिंच पाव चहाचा चमचा धने ४ मिर्‍याचे दाणे ४ सुक्या मिरच्या हळद मीठ चवीप्रमाणे किंचित तेलात धने + मिरे + सुक्या मिरच्या परतून खोबर्याबरोबर वाटाव्या. कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा. कांदा पारदर्शक झाला की घने-खोबर्‍याचं वाटण व मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे उकळवा.

फक्त तुझ्यातच

लेखक द्विज यांनी बुधवार, 15/10/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त तुझ्यातच विश्व सारे शान्त आहे फक्त तुझीच भ्रान्त आहे प्रतिभा आत्मविश्वासाने भरलेले तारुण्य फक्त तुझ्यातच जीवन किल्मिशात गु॑तलेले माझे तुझ्यात गु॑फलेले प्रत्यय, अनुभवा॑नी नटलेले कारुण्य फक्त तुझ्यातच नयनास्त्रा॑च्या वेधातुन फुललेल्या अबोल भेटीतुन अगम्यात ब्रम्ह शोधण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यातच
Taxonomy upgrade extras

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

विनोद - प्राचीन कथा

लेखक वारकरि रशियात यांनी बुधवार, 15/10/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'. मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला. आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!! तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह) (पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्‍याकडील पाहुणे असतील, तर नवर्‍याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील !

तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/10/2008 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
का पाहु मी चन्द्र आता चेहेराच तुझा दिसतो तेथे विसरावयाचे ठरवुन ही तुलाच पहातो जेथे तेथे.... तू अशी माझ्या भवती वेढाच पडे आठवणींचा जीव माझा कंठी येतो पोहताना समुद्र तो. मी प्रयत्न सोडुन बुडून जातो तुझ्यासवे पुन्हा नवा जन्म घेतो...