ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू
न सपनाचे गावान शिराचू
तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा
न आभालान फीराचा
अमिताभ बच्चनसारका सांगाचा
'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी'
माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा
'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी '
बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान
लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता
नजर आढ्याला लावून जागीत व्हता
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10064
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा हा
जोरदार.. फारच मस्त !
कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली.
कविता आवडली...
-- लिखाळ.
+१
In reply to आहा हा by लिखाळ
हेच म्हणतो !
कविता आवडली. खोलवर पोचली. भाषेमुळे खूप रंगत आली.
असेच..
In reply to आहा हा by लिखाळ
कल्पना उत्तम आहेच आणि भाषेमुळे अजुनच मजा वाढली.
कविता आवडली...
लिखाळ सारखेच म्हणते.
स्वाती
हेच म्हणतो
In reply to आहा हा by लिखाळ
(सहमत)बेसनलाडू
सहमत
In reply to आहा हा by लिखाळ
आहे, कविता आवडली.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अरे झक्कास...
एक नंबर रे टिंग्या ! एक नंबर.. :)
पुण्याचे पेशवे
हाहाहा
मस्तच रे टींग्याभाऊ..
जबरदस्त आहे कविता. भाषेमुळे एकदम वेगळाच बाज निर्माण झाला आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
मी टींग्या
In reply to हाहाहा by प्राजु
मी टींग्या नाय बाबाव
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
अव हा तो टिंग्या न्हवं ...
In reply to हाहाहा by प्राजु
हा आमचा खंबाल पाड्याचा ब्रिटीश हाय ....
खराय, तुमी
In reply to अव हा तो टिंग्या न्हवं ... by कुंदन
खराय, तुमी माजे न मी बी तुमचाच
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
आवडली.
खूप छान कविता.
रेवती
अहाहा, सुंदर कविता
भाषा आणि कवितेतील कल्पना दोन्हीही मस्तच !!!
ब्रिटीश
जल्ला काय लिवला..एकदम भारी
सुंदरच!
जल्ला काय कविता हाय रं बाला! एकदम घुसलीच की रं कालजाला!!
चतुरंग
अगदी!
In reply to सुंदरच! by चतुरंग
जल्ला, तू काय करतो ते एकदम पार हसवतं तरी नाही तर अंतर्मुख!
अदिती
बरोबर अदिती...
In reply to अगदी! by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण लई भारी लिवतो.
वाघबिळ, ठाण्याचा,
टुकुल.
फार आवडली!!
फार आवडली!! भाषेमुळे मजा आली..
व्वा बाल्या, तू तर शिक्सर मारल्यांव!!
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला
खरां बोल्लास!! तो एक सल राह्यल्लाव रं अजून काळजामंदी...
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
कं बोल्ला, कं बोल्ला!!! लय झकास!!!!
तुजा,
डांबिसदादूस
भाषेमुळे कविता जास्त आवडली
>>पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
खल्लास मित्रा
खल्लास मित्रा खाउन ताक्लस सगल्याना
चाकरमानि
( साधि राहनि उच्च विचार सरनि)
मस्तच आहे
मस्तच आहे रे कविता.
................
https://picasaweb.google.co.in/zakasrao
>> पन
>> पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
क्या बात है !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
छान !!
कविता .. आवडली
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला ... मस्त .
लै
लै भारी!!!!!!!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: https://sucheltas.blogspot.com
मस्तच...
फालच मस्त हाय...!! लै भन्नाट..!!
सुरेख
मिथुनदा कविता देखील.
सलाम!!
क भारी
क भारी लिवतो रे तु!!!
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
का रं बाला,
का रं बाला, तू कविता इतक्या लै भारी लिव्तो, मना म्हाईतीच नव्हता बोल! :)
जियो मेरे यार...!
आपला,
(मुंब्र्याहून गावठी दारूचे फुगे मुंबईला धाडणारा व गल्ल्यात सोन्याची चैन घालणारा) तात्या मोकल.
मस्त
मस्त झालिये कविता. शिर्षक पण यथायोग्य आहे.
तुमचे सगळेच लेखन वाचायला आवडते.
आपलाच
आंद्या भोईर
अहाहा...
मिथुनदा -- कविता आणि तिची भाषा लई आवडली!!
लपलेला
https://vipravani.wordpress.com/
कुठेतरी माहित होत लपलेला खरा ब्रिटीश.
बाला
डोल्यान पानी आनला तू.
मस्त कविता...
कविता मस्तच आहे. उत्तुंग स्वप्ने पुरी झाली नाहीत तरी त्यांच्याशी खेळण्यातही कोण मोठेपणा वाटतो. हि भव्य-दिव्य सप्नेच आयुष्य उजळून टाकतात. अभिनंदन.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
कविता फारच
कविता फारच सुंदर आहे , येऊ द्या अशाच सुंदर कविता ! :)
पन
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
दादानु केवरं झ्यॅक लिवलय तुमी.
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता
नजर आढ्याला लावून जागीत व्हता
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन जल्ला
जबरा लिवलस दादुस बोल ! पन तु कुट हायस?
अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा!
होबासराव, उत्खननाबद्दल आभार!
ब्रिटिश इतरत्र उपस्थित आहेत, ते ब्लॉगवरही सापडले. त्यांची मनाव पायजे ही इथे मिपावर न वाचलेली विनोदी कथा ब्लॉगवर वाचायला मिळाली. त्यांनी मिपावर पुनरागमन करावं ही विनंती!
सहमत...
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...
ब्रिटीशराव लिहिते व्हा...
आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
सहमत...
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...
ब्रिटीशराव लिहिते व्हा...
आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...
सहमत...
In reply to अतिशय सुरेख कविता! ब्रिटिश, पुन्हा इथे लिहायला लागा! by बहुगुणी
सहमत...
ब्रिटीशराव लिहिते व्हा...
आगरी कथांची सुरस मेजवानी द्या...