Skip to main content

उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सल्ला

लेखक सनातन यांनी सोमवार, 27/10/2008 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिंमत असेल, तर दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करा ! कल्याण, २६ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी सिमी व दहशतवादी यांच्या तळावर हल्ले करावेत, असा सल्ला शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. माननिय श्री. उद्धव ठाकरे याचे अभिनदन...!!!

दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

लेखक mina यांनी सोमवार, 27/10/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपापरिवारास माझ्याकडून दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
मांगल्याची आस दे कल्याणाचा ध्यास दे दिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे, मुक्त मोकळा श्वास दे , आनंदाची रास दे, स्वप्नासाटी माथ्यावरती झळझळते आकाश दे.. दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.!!

सहज सुचलं म्हणून

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/10/2008 05:21 या दिवशी प्रकाशित केले.
सजणा! माझ्या दुनियेत दोन दिवस राहूनी प्रीतिसागरात पोहलो असतो दोघे मिळूनी निष्टूरा! जाणार होतास जर दूर मला सोडूनी का नाही गेलास प्रीतिचे दोन शब्द बोलूनी
Taxonomy upgrade extras

मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 26/10/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे. ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत. परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो. मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात

माझ्या स्वप्नातील भारत

लेखक हेरंब यांनी रविवार, 26/10/2008 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या स्वप्नातील भारत असा असावा. १. कुठल्याही प्रकारचा जातिभेद वा धर्मभेद नसेल. २. त्यामुळे अर्थातच कुठल्याही प्रकारच्या विशेष सवलती कोणालाही नसतील. ३. कुठलेही धार्मिक उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे केले जाणार नाहीत. कुठल्याही धर्माचे विशेष लाड होणार नाहीत. ४. लोक शांततेने रहातील, कुठल्याही प्रकारचे ध्वनिप्रदुषण नसेल. ५. सर्व समाज भ्रष्टाचारमुक्त असेल, तसे करणार्‍यास कडक शासन होईल. ६. सर्व नेते हे पारदर्शक प्रक्रियेने निवडले जातील, काम न केल्यास मतदारांना त्यांना परत बोलावता येईल. ७. सर्व क्षेत्रांत केवळ 'गुणवत्ता ' हाच निकष असेल. ८.

अभाविपची आक्रमक धर्मांधता...

लेखक विकी शिरपूरकर यांनी रविवार, 26/10/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणक्षेत्रात आपल्या रचनात्मक आंदोलनामुळे आणि संस्कारशील तरुणांच्या संघटित ताकदीमुळे स्वतंत्र अस्तित्व तयार केलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप लावले जात आहेत. मालेगाव शहरातील नूरानी मशीद भागातील भिकू चौकात गेल्या 29 सप्टेंबर 08 रोजी रात्री झालेल्या स्फोटात 5 जण ठार झाले होते. या स्फोटामागे 'अभाविप'चे कार्यकर्ते असल्याचा आरोप समोर आला आहे.

दिवाळी अचानक मिपा कट्टा..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 26/10/2008 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे! "साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :) अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे.

हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !

लेखक सनातन यांनी रविवार, 26/10/2008 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा ! सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे.

बिग सर....

लेखक बबलु यांनी रविवार, 26/10/2008 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या ऊन्हाळ्याच्या शेवटाला आमच्या घरापासून जवळच असलेल्या "बिग सर" पॅसिफिक सामुद्रिक Scenic Highway ला गेलो होतो. मस्त प्रकरण आहे हे ! अतिविशाल पॅसिफिक समुद्र, क्यालिफोर्नियाची नयनरम्य coastline आणि उत्कृष्ट हवामान. त्यातलेच काही फोटू....