माझा बाप, डोक्याला ताप!
आमच्या बापाला अखेर आमची आवड कळली म्हणायची!
च्यायला! गेले एक-दीड वर्षं नुसता छळवाद मांडला होता मेल्यानं! याची हौस नि मला निष्कारण सजा!! आताशा कुठे रुळावर आलाय.
कशाबद्दल बोलतेय, कळलं नाही का? अर्थात आमचा बाप नि त्याचं पिक्चरचं वेड! कळायला लागल्यापासून याव्यतिरिक्त कुठलंही काम निष्ठेनं केलं नसेल त्यानं. पिक्चर म्हणजे जीव की प्राण! कुठल्याही मळ्यात असो वा एखाद्या मित्राच्या खुराड्यात...पंचरंगी महालात असो वा शेणा-मुताच्या वासात...पिक्चर बघणं सोडलं नाही. अगदी शिरीष कणेकर चावले होते म्हणा ना!
मिसळपाव