Skip to main content

श्री ट्रॅफीक दुर्दैवाचे दशावतार

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 09/01/2009 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज ट्रॅफीक मध्ये अडकलो. त्यामुळे उद्वेगान असल काहीतरी लिहून काढल . १) ट्रॅफीक जाम अवतार : आपल्याला कुठेतरी वेळेत पोहोचायच असत. नेमका तेव्हाच हा अवतार प्रकट होतो. आणि तुम्ही बाजूच्या खिडकीतले रडणारे/ केकाट्णारे पोर (जर मुंबईकर असाल तर) नायतर शेजारच्या स्कुटी/ कायनेटीक वरची बुरखाधारी व्यक्ती (जर पुणेकर असाल तर ) न्याहा़ळत बसता. . २) सिग्नल डाऊन अवतार : आपण सिग्नलपाशी क्रॉसींगला आलो रे आलो की सिग्नल पडतो (पडतो म्हणजे जागच्याजागीच लाल होतो) .

अतिंद्रिय शक्ती

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 09/01/2009 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचा अतिंद्रिय शक्तीवर विश्वास आहे का? माझा आहे. माझ्या आईला अतिंद्रिय शक्ती होती. मी सहावीत होतो. मोठ्या बहिणीला मुलगा झाल्याची बातमी सकाळी घरी आली. फोन नव्हाता घरी. वहिनीने उत्साहाने तयार करुन ठेवलेली दुपट्याची पिशवी काढली. आईच्या हातात सुपुर्द केली. घरातुन बाहेर पडताना ती पिशवी आईने बरोबर न घेतल्याचे बघुन वहिनीने ती पिशवी माझ्या हातात दिली. " त्या पिशवी चा आता काही एक उपयोग नाही" असे म्हणुन आईने पिशवी मला परत ठेवायला लावली. हाताने इशारा करुन वहिनीला गप्प बसायला सांगितले. मला तेंव्हा हा प्रकार नेमका काय ते कळाले नाही. पण दादरला हॉस्पिटल मधे गेल्यावर उलगडा झाला.

वाहतूकदारांच्या संप

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 09/01/2009 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास लवकर उठून सुप्रभाती चालत चालत रेल्वे स्टेशन पर्यंत रहदारी नसलेल्या रस्त्यावरुन जाण्याची मजा कधी अनुभवली आहे ? कालपर्यंत कंपनीने दिलेल्या गाडीतून आरामात जाणारा बॉस ८.०५ च्या ठाणे लोकल मधे लोंबकाळत उभा आहे आणि ऑफीस मधे पोचल्या पोचल्या संध्याकाळच्या गाड्यांचे वेळापत्रक विचारुन एकत्र जाण्याचे आश्वासन देत आहे असा विचार तरी कोणी करील का ? पण असे घडायला सुरवात झाली आहे. निमित्य वाहतुकदारांचा संप काही दिवसांपुर्वी चालू झालेल्या वाहतुकदारांच्या संपाकडे कॉमन मॅनचे फारसे लक्ष नव्हते. मला काय त्याचे अशी सर्वसाधार्ण मनोवृती होती.

खास आवडीचे!!!

लेखक राघव यांनी शुक्रवार, 09/01/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) - दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. कलाकार, वातावरण, छायाचित्रण, पटकथा-संवाद, संगीत-गाणी; सगळं कसं मस्त जमून आलेलं! पण या चित्रपटाचा एक विशेष मला फार आवडतो. त्याची निळाई!! बहुतेक फ़्रेम्समधे हा निळा रंग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरल्या गेलाय. चित्रपटाच्या कथा-पटकथेच्या प्रकृतीनुसार निळा रंग अगदी चपखल आहेच, कारण त्याने येणारा शीतलतेचा तजेला आपल्याला त्या वातावरणाच्या जवळ घेऊन जातो.

गुलाबी चांदणे

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 09/01/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर कुणी उकलले माझे आज गुपित गुपित फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

साठवणीतल्या आठवणी.

लेखक जयबाला परुळेकर यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हातरी मधे एकदा नातवाचे स्टडी टेबल आवरत होते. एका डब्यात हे एवढे सुगंधी रबर, स्टीकर्स, तुटकी पेन्स, स्केचपेन्स, चमचमत्या टिकल्या, गिफ्ट मिळालेल्या पण कधी न वापरलेल्या असंख्य वस्तू. आपल्या दृष्टीने नुसता कचरा साठवलाय झालं. पण विचारल तर त्यातील एकहि वस्तू टाकून देणार नाही. मग मला आठवलं, आपणहि आपल्या लहानपणी असंच मोरपिसं, चित्रे, काचेचे तुकडे, मणी अन् असंच काहीबाही साठवत होतो.

हे असं चालू शकेल?

लेखक अनंत छंदी यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
फराजची एक लोकप्रिय गझल आहे, मेहदी हसन यांनी गायिलेली शोला था जल बुझा हूं, हवाएं मुझे न दो मै कबका जा चुका हूं, सदाएं मुझे न दो. या ओळींचा स्वैर अनुवाद अंगार होतो मी, आहे विझून गेलो घालू नका मजला, फुंकर तुम्ही लोकहो पैलतिरावरी त्या, मी आहे निघून गेलो हाकारीता कशाला, आता तुम्ही लोकहो असा केला तर तो चालू शकेल का? जाणकारांनी कृपया अभिप्राय द्यावा
Taxonomy upgrade extras

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.

'सत्य म'ला उमगले!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 09/01/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
'सत्य म'ला उमगले आणि फुटला भ्रमाचा फुगा किती मिरवला आयटीचा रंगीत पण आखूड झगा कोटीच्या कोटी उड्डाणे उगीच दाखविली जगा सत्य कळले तेव्हा सत्य सगळ्यांना डसले बघा रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा नशीब पेपर सेट करतयं, म्हणतयं "आता भोगा" आऊट ऑफ सिलॅबस आहे पेपर, नशीबच देतयं दगा आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा पिझ्झा?
Taxonomy upgrade extras