लेखकअविनाशकुलकर्णीयांनी मंगळवार, 13/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात....
आज संक्रांत.
संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला.
लेखकअभिजीत मोटेयांनी मंगळवार, 13/01/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
काल सोमवार म्हणून सहपरीवार शिवमंदिरात गेलो होतो. त्याच वेळी एक सुशीक्षीत कुटुंब मंदिरात आले आणि त्यांच्यापाठोपाठ त्या मंदीराचि पुजारीन धावत आली. आली तशी त्यांच्यावर ओरडायला सुरवात, "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका". तो (कुटुंबप्रमूख) पडला हिंदी, बावळ्यासारखा त्या बाईच्या तोंडाकडं बघू लागला. परत पुजारीन ओरडली "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका. सातच्या नंतर पिंडीवर काय वतायचं नाय. आताच सगळं नीट धून घेतलय". हा आपला परत तीला वीचारअतोय, "क्या हूंऑ". "क्या हूआ क्या राती सात नंतर काय वतायचं नाही देवावर".
लेखकसुनील मोहनयांनी मंगळवार, 13/01/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत?
बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय.
लेखकजृंभणश्वानयांनी मंगळवार, 13/01/2009 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
समिधाताईंनी दिलेली गवारीच्या पुर्यांची ही पाककृती वाचून गवारीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला.
कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत.
***
गवार
बारकुळी ती, हिरवी हिरवी,
छान कोवळी,
गवारशेंग मला हवी
कुटाबरोबर वाफवलेली,
छान रटरटीत शिजवलेली,
गवारशेंग मला हवी
भले कितीही गोड मटार,
फोलपटे बेचव त्याची,
पापुद्रयासहित दाण्यांची,
गवारशेंग मला हवी
आडदांड तो फ्लॉवर केवढा,
सात्विक तो श्रावण घेवडा,
दुध्याचा डौलदार आकडा
अहो घ्या ते शेकडा,
घ्या ते शेकडा,
पण गवारीचाच सडा
दारी माझ्या