देवळाच्या दारात भक्ती ?
लेखनप्रकार
काल सोमवार म्हणून सहपरीवार शिवमंदिरात गेलो होतो. त्याच वेळी एक सुशीक्षीत कुटुंब मंदिरात आले आणि त्यांच्यापाठोपाठ त्या मंदीराचि पुजारीन धावत आली. आली तशी त्यांच्यावर ओरडायला सुरवात, "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका". तो (कुटुंबप्रमूख) पडला हिंदी, बावळ्यासारखा त्या बाईच्या तोंडाकडं बघू लागला. परत पुजारीन ओरडली "तांब्यात काय हाय तुमच्या, दुध आसल तं पिंडीवर वतु नका. सातच्या नंतर पिंडीवर काय वतायचं नाय. आताच सगळं नीट धून घेतलय". हा आपला परत तीला वीचारअतोय, "क्या हूंऑ". "क्या हूआ क्या राती सात नंतर काय वतायचं नाही देवावर". त्याने शेजारी उभारलेल्या व्यक्तीला विचारलं "क्या बोल रहि है ये". शेजार्याने त्याला निट समजाऊन सांगीतले तर याचा प्रश्न "अब लेके आये है तो क्या करेंगे". "नहि नहि! काय वतु नका, किसी गरीब को दो". तो, " क्या बोली वो". शेजारी "बोल रही है, भगवान पे मत डालो, किसी गरीब को दो ". तो "क्यों?". शेजारी, "रात को सात के बाद कुछ डालना नही पिंडीपर". तो, "सात बजे तक तो हम ऑफीससेही नही आते". ति, "वो कुछ नहि, डालना नही मतलब नही". त्याला समजेना काय बोलावते म्हनून तो तसाच ऊभा राहीला. पुजारीनीला वाटलं हा थांबला म्हनजे आता काय हा ओतणार नाही म्हणून ति तिथुन निघुन गेली. ती गेल्याची खात्री होताच त्याने दुधाचा तांब्या पिंडीवर पालथा केला पटकन वरून पाणी ओतून, दर्शन घेऊन बाजुला. जवळ जवळ दोन लीटर दूध तर वाया गेलेच पन एवढी चकाचक करून ठेवलेली महादेवाची पिंड देखील परत खराब झाली.
मला दूधाची नासाडी करणे तर आवडले नाहीच पन मंदिराला वेळेच्या बंधनात अड्कवने पन पटले नाही (सदर मंदीर रात्री ९ नंतर बंद केले जाते. आमच्या गावाकडे मंदीराला दार पन नसते ईथे, मंदीराला कुलूप लावून ठेवतात.). एवढ्या सगळ्या प्रसंगात एक गोष्ट मात्र फार चांगली ऐकायला (पहायला मीळाली असती तर......असो, हेही नसे थोडके.) मीळाली, त्राग्यात का असेना पन त्या पुजारीन बाईने ' दूध एखाद्या गरीब माणसाला द्या ' म्हणून दीलेला सल्ला.
वाचने
1447
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
हा हा
बिनडोक लोक अण्खिन कय?