Skip to main content

बाप्पाचा प्रॉब्लेम...!

लेखक झेल्या यांनी सोमवार, 19/01/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मला झाली सर्दी नाकात झाली फारच गर्दी नाकावाटे फर्र् फर्र.. चालू नुसते दिवसभर खॉक् खॉक् अधून मधून त्यावर औषध सुंठ-लसूण बेजार खोकून नाक पुसून काय काय घेता मधामधून गणपती बापा मोरया सर्दीतून मज तार या तारलेस जर सर्दीतून शंभर मोदक देईन आणून बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं ऐकून तर घे तू म्हणणं माझं... मलाही झाली आहे सर्दी नाकात झालीय् फारच गर्दी एवढसं नाक तुझं तर.. माझा जरा विचार कर...! -झेल्या
Taxonomy upgrade extras

तुज्या मिपाला.....

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 19/01/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आमचे मित्र श्री तात्या मिपाकार यांना आमचा आपला एक मैत्रीखातर इशारा.:) ...मूळ चाल, तुज्या ऊसाला....) फड गप्पांचा रंगात आलाऽऽऽऽऽ फड गप्पांचा..... रंगात आलाऽऽ तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ.... तुझ्या मिपाला लागंल कोल्हा, रं, तुझ्या मिपाला लागंल कोल्हाऽऽऽ.... आंतरजाल म्हंजे निख्खळ सोनं, त्यात म्हराठीचं रुजलं बियाणं, तुझा फड वाढला जोमानं, तुझा फड वाढला जोमानं..... सभासदांनी उभारी धरली, धाग्याधाग्यातून तर्री पेरली, "अवांतरा"नं पानं भरली! सडा पिंकांचा तांबडा ओलाऽऽऽ सडा पिंकांचा, तांबडा ओला, रं.....

गोठलेले सरोवर

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 19/01/2009 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेले १०-१२ दिवस म्युन्स्टर मधले तपमान साधारण -७ ते -१२ याच दरम्यान होते. दिवसभर थंडगार वारे, रस्त्याची कडेला गोठलेले दंव, झाडाच्या पानांवर त्याच हिमदवाची झालेली नक्षी असे एकंदरीत चित्र होते. 'अशी थंडी सतत तशीच आहे म्हणजे उद्या परवा 'आझे' नक्कीच गोठेल' गेल्या शुक्रवारी आम्ही असा विचार करत असतानाच आमच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर रहाणारा श्रीनिधी शनिवारी सांगायला आला, ' मी आत्ताच बाहेर जाऊन आलो, आझे पूर्ण गोठला आहे. आज दुपारी जाऊया का तिथे?' आम्ही दोघं लगेचच उत्साहाने तयार झालो. आझे म्हणजे 'आ' नावाच्या म्युन्स्टरमधील नदीवरचे मोठे सरोवर. हे सरोवर साधारण २.५ किमी लांब आहे.

एक कथा - २ !!!!

लेखक चेतन१२३प यांनी रविवार, 18/01/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
गूड मॉर्निंग! सर्वप्रथम तुरीनाच्या विनंतीला मान देत आपण येथे आलात त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!! त्यानंतर तुरीनाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग लिस्टिंगसाठी सर्व इन्वेस्टर्संना हार्दिक शुभेच्छा. तुरीना कन्स्ट्रक्शन्सच्या अतिव महत्वाकांक्षेचे उदाहरण म्हणजे "पॅराडेसिया". जसे की मी आइ पी ओ रिलिझींगच्या प्रेस कॉन्फ़रंस मध्ये बोललो होतो, हा आइ पी ओ "पॅराडेसिया" या तुरिनाच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी निर्माण झाला आहे. पॅराडेसिया हि केवळ एक संकल्पना केवळ एक स्वप्न नसुन ते या संपुर्ण देशाचे भविष्यातले वैभव आहे. हे शहर देशाच्या जगातल्या प्रतिमेला आणखी उंचावेल.

दह्यातलि बटाटा रस्सा भाजि

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 18/01/2009 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
खुप म्हणजे खुप दिवस झाले..त्या वेळि लक्ष्मी रोड वर[पुण्याच्या] संतोष भुवन नावाचे हॉटेल होते..आता तिथे ते हॉटेल नाहि व कापडाचे दुकान आहे..त्या हॉटेल चि एक खास डिश होति..दह्यातलि बटाटा रस्सा भाजि व पु~या...भाजिवर तर्रि मारलेलि असायचि व पहिल्या घासाला हमखास ठसका लागायचा...खुप चवदार डिश होति ति..आता ते हॉटेल राहिले नाहि तर कुणास माहित असल्यास कुणी त्या दहिबटाटा रस्सा भाजिचि रेसिपि सांगु शकेल काय????? महत्वाचे....क्रुपया पुरिचि रेसिपि सांगण्याचि तसदि घेवु नये.

तिळाची वडी

लेखक नीरजा यांनी रविवार, 18/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रात/रथसप्तमी करिता तिळा-साखरेच्या वड्या. साहित्य: एक वाटी साखर, एक मोठा चमचा तीळ, एक चमचा तुप, वेलचीपुड इ. कृती : एकीकडे तिळ हलके भाजुन घ्या, नॉनस्टिक पॅनमधे साखर घालून मंद आचेवर पाक होईपर्यंत सतत ढवळत रहा (पाणी न घालता) तयार पाकात भाजलेले तिळ, वेलचीपुड आणि तुप घाला. तयार मिश्रण लगेच तुप लावलेल्या थाळ्यात किंवा पोळपाटावर ओता. मिश्रण थंड होण्यापुर्वी वड्या पाडा. तिळ आणि गुळाने उष्णता वाढते, गुळाला पर्याय म्हणुन साखरेच्या या वड्या छान लागतात.

पंढरी (अष्टाक्षरी)

लेखक प्रशांत.पोरे यांनी रविवार, 18/01/2009 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीचा विठूराया, पंढरीत आहे कुठे? वाट विठूची पहात, उभे मंदीर एकटे! रखुमाईही पुसते, "कसा दिवस हा आला? विना सांगता कुणाला, कुठे नाथ माझा गेला? नाही कुणी कान्होपात्रा, आज कुणी जना नाही. ज्यांच्या मदतीच्या साठी, देव देवळात नाही." विठू कधीच नव्हता, पंढरीच्या मंदिरात, तोच सांगे "नका पाहू, मला काळ्या पत्थरात." देव सांगे आज मला, "देव तुझ्याच घरात, घरातल्या विठ्ठलाच्या, काय जाण अंतरात. बाप तुझा रे विठोबा, अन आई रखुमाई, त्यांच्या पायधुळीचीही, सर पंढरीस नाही. माय पित्याहून दुजा, स्वर्ग नाही हे सांगतो, तीच तुझी रे पंढरी, विठू तिथेच नांदतो."

धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

लेखक कपिल काळे यांनी रविवार, 18/01/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले. आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे.

एका ऑफिस सेक्रेटरीची कैफियत

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 18/01/2009 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यामुळे जगावंस वाटतं तेच काम करावं." माझ्या मित्राच्या तिनही मुली चांगल्या शिकल्यात.एक डॉक्टर आहे तर एक वकील आहे आणि तिसरी ही इंग्लिश घेऊन एम.ए.आहे.तुला कुठेही कॉलेजात लेक्चरर किंवा प्रोफेसर होता आलं असतं मग तू एका ऑफिसात सेक्रेटरीचा जॉब का पत्करलास? असं मी विचारल्यावर ती म्हणाली, "मी सेक्रेटरी व्हावं असं मला का वाटायचं?कारण जसे हातमोजे हातात फिट्ट बसतात तसंच हे सेक्रेटरी होणं मला फिट्ट बसतं.मी ते काम करायला जाते ज्यावर मी प्रेम करते.ते काम म्हणजे जे सुनियोजित करण्यात जे सुव्यवस्थित करण्यात माझा वेळ जातो.