मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा प्रॉब्लेम...!

झेल्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एकदा मला झाली सर्दी नाकात झाली फारच गर्दी नाकावाटे फर्र् फर्र.. चालू नुसते दिवसभर खॉक् खॉक् अधून मधून त्यावर औषध सुंठ-लसूण बेजार खोकून नाक पुसून काय काय घेता मधामधून गणपती बापा मोरया सर्दीतून मज तार या तारलेस जर सर्दीतून शंभर मोदक देईन आणून बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं ऐकून तर घे तू म्हणणं माझं... मलाही झाली आहे सर्दी नाकात झालीय् फारच गर्दी एवढसं नाक तुझं तर.. माझा जरा विचार कर...! -झेल्या

वाचने 2421 वाचनखूण प्रतिक्रिया 10

छान आहे मित्रा कविता, तुला अनुभव आहे वातट॑ सर्दीचा, २ दिवस मला ही होती सर्दी औषध घेतल॑ ६ डोस, प्रत्येकी ४ गोळ्या २ दिवस . डोम्बिवली फास्ट :- 9.33 pm. @ CST

In reply to by अनामिक

झेल्या 20/01/2009 - 10:26
बाकी जबरदस्त टायमिंग साधून हा प्रश्न विचारलात... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )

सुनील 20/01/2009 - 11:21
बाप्पाला स्वेटर घालणारे तुम्हीच तर नाही ना? =)) =)) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.