बाप्पाचा प्रॉब्लेम...!
एकदा मला झाली सर्दी
नाकात झाली फारच गर्दी
नाकावाटे फर्र् फर्र..
चालू नुसते दिवसभर
खॉक् खॉक् अधून मधून
त्यावर औषध सुंठ-लसूण
बेजार खोकून नाक पुसून
काय काय घेता मधामधून
गणपती बापा मोरया
सर्दीतून मज तार या
तारलेस जर सर्दीतून
शंभर मोदक देईन आणून
बाप्पा म्हणाला खरं आहे तुझं
ऐकून तर घे तू म्हणणं माझं...
मलाही झाली आहे सर्दी
नाकात झालीय् फारच गर्दी
एवढसं नाक तुझं तर..
माझा जरा विचार कर...!
-झेल्या
Taxonomy upgrade extras
मिसळपाव