Skip to main content

घट पोटावर घट कमरेवर...

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 01/02/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २-३ महिन्यात बर्फ आणि थंडिमुळे आमचे पळायला जाणे बंद झाले.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा ह्या न्यायाने आमच्या सर्व तुमानी आम्हाला घट्ट व्हायला लागल्या. याच सुमारास आमच्या बिनतारी मित्राचा आमी कापड का घाल्तो ह्या गहन विषयावरचा आत्मपरिक्षणात्मक लेख वाचनात आला. तेव्हापासून पी.

देणार्‍याचे हात घ्यावे...

लेखक मृण्मयी यांनी रविवार, 01/02/2009 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
"गजाभाऊ, काय हो काय झालं?" गजाभाऊ ४-५ मुलींच्या भेदरलेल्या घोळक्याला घेऊन येताच कारेकर बाईंनी चौकशी केली. "त्यानलाच विचारा! सांगा महालक्ष्म्यांनो, खरं सांगा. लबाड बोलायचं काम न्हाई." पाचातल्या चार महालक्ष्म्या खाली माना घालून उभ्या होत्या. पाचवी नुस्तीच टकामका बघंत उभी राहिली. "बोला गं कुणीतरी पटापटा! बाकी कामं आहेत मला." कारेकर बाई वैतागून म्हणाल्या. "ह्या काय बोलतील बाई? मीच सांगतो. ह्या पोरी मधल्या सुट्टीत फाटकावरून कुदून बाहेर गेल्या बोरंवाल्या म्हातारीकडं! म्हणाल तं एकीजवळ पैसा न्हाई. उधारीचा मामला! आधीची पण उधारी हाए ह्यातल्या दोघींची. म्हातारी सोडेना.

“बोली भाषेतील शब्द”? असे काही असते का?

लेखक मराठी शब्द यांनी रविवार, 01/02/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक प्रसंग रंगवायचा आहे. त्यात मला एकाच वस्तूचा वापर करुन त्यातील पात्र त्या वस्तूचा कसा वापर करत आहे हे दाखवायचे आहे. काय योग्य आहे आणि काय नाही हे वाचकांनी ठरवावे. १. नर्मदाबाईने बुट्टी घेतली व त्यात गोवर भरुन घेतली. २. सख्याने टोकरी सायबाला दाखवली आणि साहेब काय समजायचे ते समजला. ३. माधवीने २ सफरचंद, ३ संत्री आणि ३ हापूस त्या वेताच्या नाजूक घडणीच्या सुंदरशा टोपलीत ठेवली ४. रीटाला तीची ती चायनीज बाउलची खरेदी फारच महागात गेली.

आठवण

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण आपल्यापासून दूर राहिल्यावर आठवण अधिक सतावते फोन करून बोलता-बोलता बिल आडंव येत आठवणही मग पैशात तोलली जाते
Taxonomy upgrade extras

हुंडाबळी

लेखक शर्मीला यांनी रविवार, 01/02/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
हुंडाबळी मला लगीन कराव पाहिजे हुंडा देणारी मुलगी पाहिजे चिकनी असो वा चकणी असो शिक्षित असो वा अशिक्षित असो
Taxonomy upgrade extras

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती

लेखक त्रास यांनी रविवार, 01/02/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव वरील एक चर्चा वाचल्यानंतर हे लिहावेसे वाटले. आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो? माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने. मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते.

अजय-अतुलचे अफलातून संगीत

लेखक त्रास यांनी रविवार, 01/02/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
अजय-अतुलने एकापेक्षा एक अशी सरस गाणी देउन मराठी चित्रपट संगीतात एक नवे युगच निर्माण केले आहे. ह्या द्वयीचे सगळ्यात जास्त कौतुक ह्याचे वाटते की, त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलेच नाही. तरी सुद्धा त्यांचा संगीत अविष्कार इतका तालबद्ध असतो की, त्यांची कीर्ति आंध्रातही पोहोचली व त्यांनी एका तेलगू चित्रपटालाही संगीत दिले. त्यांची गीते ऐकतांना मला रेहमानच्या "थिरुडा-थिरुडा" ह्या तामीळ गाण्यांचे संगीत आठवते. रेहमानच्या सुरुवातीच्या काळातील हा एक संगीतातील अप्रतिम नमुना होता. राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.

शिंडीबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ईथे द्या

लेखक शंकरराव यांनी रविवार, 01/02/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
शिंडीबाई क्रॉफर्ड २० फेबूरवारी २००९ ला ४३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे मान्यवर मिपकरां तर्फे शिंडीबाईंना शुभेच्छा, भावना, कविता, लेख ह्या धाग्यामर्फत पोहोचाव्या ह्या हेतूने हा खटाटोप... शिंडीबाईंना तात्याने निमंत्रण धाड्ले आहे. त्यांचा नजीकच्या काळात मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे... (सदर कर्यक्रर्माचे आमंत्रण तात्या लवकरच सर्वांनां ?? देईल ) ... ह्या धाग्यावरील शुभेच्छांचे सूंदर पुस्तक, एक नउवारी व कुंकवाचा करंडा शिंडीबाईंना भेट म्हणून दिला जाईल ;-) (अधिक भेटवस्तू सुचवाव्या) शिंडीबाई कोण ? ?

तुम्हाला लिहिता येते ?

लेखक रेझर रेमॉन यांनी रविवार, 01/02/2009 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
भरतकुमार राऊत (राज्यसभेवर जाण्या आधी) यशवंतच्या व्ही.आय.पी. मध्ये भेटले. निमित्त "इको फोक्स" ची स्पर्धा. विषय पर्यावरण... बोलताना विषय आधुनिक मराठी वर आला... मुलांना मराठी नीट बोलता-लिहिता येत नाही असा सूर होता. राऊतांचा विरोध... मुलं मराठीच आहेत आणि ती बोलतात ती भाषा ही मराठीच आहे... लिहितात तो प्रकार मराठीत प्रचलित झाला नसेल तर होईल. आणि नाहीच होऊ शकला तर तिसरा नवा प्रकार येईल. भाषाशुद्धी ही समकालिन संकल्पना आहे आणि तिच्यावर प्रतिगामी विचारांची बळजबरी, संस्कृति या अवजड शब्दा मागून उतरवलेली आहे. मुळात भाषाशुद्धी नावाचा प्रकारच "माझी बोली" या अहं शी निगडित आहे.

तुला पिताना पाहिलं की.......

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 31/01/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की....... तुला पिताना पाहिलं की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई दुथडी भरुन वाहू लागते तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो चखण्याची चाहूल लागण्या आधीच चमचा काटा फुलवून नाचतो तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला पिताना पाहिलं की टेबल हसू लागतात सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला पिताना पाहिलं की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात चिंब होऊन भिजू
Taxonomy upgrade extras