Skip to main content

तुला पिताना पाहिलं की.......

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 31/01/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा प्रेरणास्त्रोत अनंतसागर ह्यांची तुला हसताना पाहिलं की....... तुला पिताना पाहिलं की कोरड्या ग्लासाला पालवी फुटते आणि दिवसभर कोरडी असणारी सुरई दुथडी भरुन वाहू लागते तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो चखण्याची चाहूल लागण्या आधीच चमचा काटा फुलवून नाचतो तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो तुला पिताना पाहिलं की टेबल हसू लागतात सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात तुला पिताना पाहिलं की तो शेजारचा टेबलवाला तुझ्या पिण्यावर जळू लागतो आणि तु मात्र मदिरेच्या प्रेमात चिंब होऊन भिजून जातोस.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2855
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

ह ल क ट

=)) जबरा ! जबरा ! अती जबरा ! *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

तुला पिताना पाहिलं की मलाही तहान लागते , रम-वीस्कीच्या तालावर आसमंत डोलु लागते !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

तुला पिताना पाहिलं की मलाही तहान लागते , =)) =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

तुला पिताना पाहिलं की त्या बर्फालाही पाझर फुटतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो क्या बात है.......खुपच छान वेताळ

तुला पिताना पाहीलं की वाटतं थोडी उतरवावी घशात बारमालक गल्ल्यावरुनच ओरडतो भा* पैशे हायेत का खिशात? सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अप्रतीम विडंबन..! :) तुला पिताना पाहिलं की भरलेल्या ग्लासात वसंत अवतरतो सोडा तर चोहिकडे सप्तरंग उधळीत फिरतो सर्व खुर्च्या जणू तुझ्यासाठीच गाणे गातात वरील ओळी तर क्या केहेने! जियो..! :) आपला, (जॅक डॅनियल्स प्रेमी) तात्या.

श्री खेचर यांच्याशी सहमत :)

आज लई पिणार.....

विडंबन वाचून हवा तितका आनंद नाही झाला