Skip to main content

म्हणजे...

लेखक शितल यांनी सोमवार, 02/02/2009 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
"ओढ" म्हणजे काय ते  जीव लावल्याशिवाय समजत नाही.  "विरह" म्हणजे काय ते  प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.  "प्रेम" म्हणजे काय ते  स्वत: केल्याशिवाय समजत नाही "पराजय" म्हणजे काय ते शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही "दु:ख" म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही. “सुख" म्हणजे काय ते स्वत: मध्ये शोधल्या शिवाय मिळत नाही.
Taxonomy upgrade extras

स्वप्नपरी

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 02/02/2009 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
घालीत साद फुलवित रात स्वप्नात सखी ती येते लाजून जरा हासून जरा देहात मिसळुनी जाते ती स्वप्नपरी ती ती धुंद कळी ती ती रातराणी ती माझी ती मुग्ध बासरी मंद हासरी प्रिया सखी फुलराणी श्वासात गंध ओठात चंद्र मग रात धुंद ही होते प्रणयास रंग रेशमी संग मग कळी फुलुनि येते ती स्वप्नपरी ती --- जागती रात धुंदीत गात कसली पहाट मग होते जुळवीत सूर नादात चूर स्वप्नात रोज ती येते ती स्वप्नपरी ती ---
Taxonomy upgrade extras

२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती- भाग २

लेखक त्रास यांनी सोमवार, 02/02/2009 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे. त्याबरोबरच आयुर्वेदात वर्णन केलेले व सणवाराला खाण्याचे पदार्थ पाहिले असता, त्या त्या ऋतूत मानवाला आरोग्यास मदत होइल असे पदार्थ सुचवलेले आहेत. इतका बारीक अभ्यास कोणत्या संस्कृतीत आहे? विचार करा, जेव्हा "अग्री"कल्चर" हे एक कल्चर नव्हते, तेव्हाचा मानव खाद्यपदार्थ कोणते असावेत, कोणते नसावेत ह्याचा कसा निर्णय घेत असेल? अर्थातच प्रयोगातून आणि वेळ्प्रसंगी जीवाची किंमत मोजून तो ते शिकला असेल.

अहिंसावादी - म्हणजे काय ? (गांधीवाद नाही )

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/02/2009 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी जैन ! त्यामुळे लहानपणापासूनच मी अहिंसा अहिंसा चा जाप करताना घरापासून बस्ती (जैन मंदिर) पर्यंत लोकांना / मुनींना पाहीले आहे त्यात मला काहीच नाविन्य नाही पण भटांच्या एकाला चित्रकलेला (डिजिटल कला) एका मिपाकरांने प्रतिसाद दिला की मला पहिले आवडले व दुसरे नाही कारण ते अहिंसावादी आहेत म्हणून. आता मला एक गोष्ट नेहमीच भेडसावत असते... ती गोष्ट त्यांच्या त्या वाक्याने एकदम मनात परत आली व त्यासाठी हा काथ्याकुट ! जगदिश चंन्द्र बोस ह्यांनी १९३७ पुर्वीच हा शोध लावला होता की वनस्पती व झाडं ह्यांना जाणीव असते म्हणजे त्यांच्या पण जीव असतो ते सजीव आहेत, आता हिंसा म्हणजे काय ?

कोल्हापूरचं घर मेणाचं!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 02/02/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
ढकलपत्रातून आलेल्या काही छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली. कोल्हापूरजवळ हे मेणाच्या पुतळ्यांचं एवढं सम्रुद्ध विश्व? आहे कुठे बुवा हे नेमकं? बरं, ढकलपत्रं तयार करणार्‍या आणि तशीच पुढे पाठवणार्‍यांना या मूळ संकल्पनेचे जनक कोण, याचं कुणालाच सोयरसुतक नसतं. हे कुणाल विचारावं, याचा विचार करताना `मिपा'ची आठवण आली. तुम्ही कुणी पाहिलंय का हे ठिकाण?

-२३००० ते +२००९

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 02/02/2009 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी नशिब चांगले असते. लोकल मधे चक्क खिडकीची जागा मिळते. सकाळी साडेसात वाजता दादरच्या एका शाळेत जायचे होते. बसल्या बसल्या डूलकी लागली. गाडी सुरु कधी झाली ते कळालेच नाही. Nowadays there is a decline in moral degradation. हे वाक्य कानावर आले आणि खड्बडुन जागा झालो. च्या मारी गाडी मंगलोर ला पोचली की काय असा दाट संशय आला. बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. मला अचानक जागा झालेला बघुन त्याने म्हटले,"सॉरी हं" तुमची झोपमोड केली. मी गप्प राहीलो. "पण मी म्हणतो ते खरे आहे की नाही". आणखी एक शीटी . आता मात्र राहवेना.

धुकट सकाळ

लेखक धनंजय यांनी सोमवार, 02/02/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र) picture (पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे.
Taxonomy upgrade extras

नक्षलवादी दहशतवाद

लेखक विकास यांनी सोमवार, 02/02/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात दहशतवाद हा शब्द कायम "सीमे पलीकडून" होत असलेल्या अतिरेकी कारवायांना वापरायचे, अजुनही वापरतात. त्यात शक्यतो धर्म आणायचे टाळणे हे श्रेयस्कर मानले गेले आणि जो पर्यंत त्यात धर्मामुळे असे घडत नव्हते तो पर्यंत ते बरोबरही होते. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, "शिख दहशतवाद" म्हणू लागले. मग याचा अर्थ आपण एकतर शिख धर्म/पंथाशी लावू शकता अथवा शिख समाजाशी लावू शकता... ९/११ च्या हल्ल्यानंतर "इस्लामीक टेररीझम" हा शब्द जगभर वापरात आला आणि काही अंशी भारतीय माध्यमांची योग्य ठिकाणी तसा उल्लेख करायची भिड चेपली. (अर्थात यात मी सर्वसाधारण पणे जी कुठल्या पक्षाची मुखपत्रे नाहीत अशा माध्यमांबद्दलच बोलत आहे).

आणखी एक पुणेरी पाटी...

लेखक ओंकार देशमुख यांनी रविवार, 01/02/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... आज बय्राच दिवसानी ब्लॉग वर काहीतरी लिहायला आलोय... सद्या आमच्या मोठ्या शाळेत म्हणजे कॉलेज मधे सब मिशन आणि ज्युरींच वार वहात असल्यामुळे तिकडे थोडं लक्ष द्याव लागत...असो... तर..आज रविवार असल्यामुळे बाहेर जेवायचा बेत ठरला होता... तेव्हा वाट बघत असताना भरत नाट्य समोरच्या सी-लाइ च्या शोरुम च्या काचेवरची ही मजेदार पाटी वाचली...पाटी वाचून ही पाटी पुण्यातली आहे हे सांगायची काही गरज वाटत नाही ......आणि नाही समजलं तर द्या सोडून... "आमच्या येथे कोणालाही समजावून सांगण्याचा ठेका घेतलेला नाही"- धन्यवाद.