मराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलं कि मराठी बोलायची लाज वाटते
कामानिमित्त बेंगालुरु (आधीचे बेंगलोर) मधे काही दिवस राहण्याचा योग आला होता. तिथे पोचल्यावर असे वाटले कि दुसर्या देशात आलो आहोत आणी ते सुद्धा व्हिसा आणी पासपोर्ट शिवाय. तेलगू, तमिळ आणी कन्नड आणी काही अंशी इंग्रजी वापरात असलेल्या या चार भाषा. पहिला दिवस गेस्ट हाऊस वर दुरदर्शन संचावर काही कार्यक्रम बघण्यात गेला. दुसर्या दिवशी ऑफिसात गेलो आणी गेट वरच्या रखवालदारापासुन ऑफिसातल्या सर्व लोकांशी इंग्रजी भाषेत संवाद साधावा लागला. एकटं वाटु लागल्यानं थोडासा निराश असा मी कँटीन मधे गेलो आणी कोपर्यातल्या एका टेबल वर बसलो. इतक्यात चार मराठी शब्द कानावर पडले आणी मी थोडा खुष झालो.
मिसळपाव