कामानिमित्त बेंगालुरु (आधीचे बेंगलोर) मधे काही दिवस राहण्याचा योग आला होता. तिथे पोचल्यावर असे वाटले कि दुसर्या देशात आलो आहोत आणी ते सुद्धा व्हिसा आणी पासपोर्ट शिवाय. तेलगू, तमिळ आणी कन्नड आणी काही अंशी इंग्रजी वापरात असलेल्या या चार भाषा. पहिला दिवस गेस्ट हाऊस वर दुरदर्शन संचावर काही कार्यक्रम बघण्यात गेला. दुसर्या दिवशी ऑफिसात गेलो आणी गेट वरच्या रखवालदारापासुन ऑफिसातल्या सर्व लोकांशी इंग्रजी भाषेत संवाद साधावा लागला. एकटं वाटु लागल्यानं थोडासा निराश असा मी कँटीन मधे गेलो आणी कोपर्यातल्या एका टेबल वर बसलो. इतक्यात चार मराठी शब्द कानावर पडले आणी मी थोडा खुष झालो. मागे वळुन पाहिले तर एक व्यक्ती फोनवर मराठीत बोलत असल्याचे दिसले. आशावादी मनाने मी त्याचं फोनवरचं संभाषण संपताच त्याला गाठलं आणी विचारलं " आपण मराठी आहात का?"
त्याने माझ्याकडे विक्षिप्तपणे पाहिले आणी म्हणाला : " येस. "
मी: "मला थोडी मदत हवी आहे"
तो: " व्हॉट काईंड ऑफ हेल्प?"
मी: "मी इथे नवीन आहे आणी मला राहण्यासाठी घर शोधत आहे. तुम्ही काही महीती देऊ शकता का?
तो: "डु वन थिंग. बाय न्युज पेपर अन्द लूक फोर द ऍड्स." एवढे बोलुन तो सरळ चालता झाला. (मदत नाही केली तरी चालेल पण आपल्या मायबोलीत बोलायला काय लाज वाटत होती क ह्या हरामखोराला?)
हा एक छोटासा अनुभव. असे बरेच अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी मला आले . आपली लोकं हिंदी बोलायला तयार असतात पण मराठी नाही, आणी या सर्वांचा सारांश असा कि
मराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलं कि मराठी बोलायची लाज वाटते
ह्यावर आपले मत काय?
नोंद घ्या: मराठी लिखाणाची सवय नसल्याने मिपा वर अपेक्षित असलेली भाषा शैली माझ्याकडे अजुन नाही. विषयाचा आशय समजुन घ्यावा ही नम्र विनंती.
वाचने
8938
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या
(मदत नाही
In reply to तुमच्या by मृण्मयी
माझा लेख
मी
मस्त ...
In reply to मी by अमृतांजन
मलाही
In reply to मस्त ... by छोटा डॉन
आपण हटायचे नाही
महाराष्ट्राबाहेर कशाला साहेब
अगदी
In reply to महाराष्ट्राबाहेर कशाला साहेब by संदीप चित्रे
मुंबईत
In reply to अगदी by रेवती
नाही हो . .
मुंबईत देखील
भाजीवालीश
In reply to मुंबईत देखील by शोनू
"स्वभिमान",
In reply to भाजीवालीश by वजीर
वजीर भाउ,
In reply to भाजीवालीश by वजीर
भाषा ही
घरचे वळण महत्वाचे
मराठी
मराठी माणसाने मराठी माणसाशी
बँगलोर मधे मराठी ऐकायचंय?
काही
तुमच्या
मराठी
लोल
In reply to मराठी by समीरसूर
प्रतिसाद आवडला . .
In reply to मराठी by समीरसूर
माझाही अनुभव
मुंबईमध्ये
मुंबई मराठी
In reply to मुंबईमध्ये by मराठमोळा
हा हा हा!!
In reply to मुंबईमध्ये by मराठमोळा
हाहाहा...
In reply to हा हा हा!! by चतुरंग
या चर्चेत
आहेत आहेत...
In reply to या चर्चेत by विकास
संवाद
भाषा हे एक
सहमत
In reply to भाषा हे एक by llपुण्याचे पेशवेll
समर्थन
In reply to भाषा हे एक by llपुण्याचे पेशवेll
पलायनाचे समर्थन