Skip to main content

पैशे महत्वाचे की, मित्र.

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा स्व-अनुभव आहे. क्रुपया वाचण्याठी वेळ द्यावा. ही. नम्र विनंती. मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती. माझ्या जवळ्च्या काही मित्रांना मी काहि रुपये उधार दिले आहेत. मागतांना अत्यंत गरज आहे, महत्वाचे काम आहे, असे काहिजण म्हणाले होते, मी पण मित्राला मदत म्हणुन रुपये दिले. सगळेजण २-३ महीन्याच्या आत परत करु असे म्हणाले होते. पण आज पर्यत्न कोणी सुध्दा परत केले नाहि. काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे) माझ्या मते, जसे रुपये मागायला हे आले होते, तसेच परत करण्यासाठी सुध्दा त्यांनिच यायला हवे.

यालाकमो हिदा श्यादि

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/03/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
लेतेसनि रसु नतुलिन्जओ ते लम तव्निकु हेआ सवशा त्तोघे लेकमो की मी त्ताअ तरुविनि हेआ कुए द्या जम रिसबा त्य्य न्च्याबुबा तुताबे नी न्धगदुम्रु कहमो क्दाए द्याउरभ लाम नितुसवशा च्यत्रिर मरमिति तिहो लीलधा जी वेसआ न्दुबिवद नौहो लितभे जम त्यामलत्या वेसश्पापु नतुलाफुनापा नतुरर्झनि चीश्तिश्रु ही नेन्दस्प न्गतुउ ताला रावानरा तीदे जम ही नेन्त्रमआ च्गलूह ते गध निम्बचु तीजा चेलाफु वेतता थओऔ ल्याओअ चेल्याकपा न्दधु नअउहो वेराथरथ लेरव्हेअ ते ख्यसौ मी की चेरीकनो शपा तेहो हीसजातिक्शि झ्ह्यामा चेनाम सेदवक कौथा तेहो मयनि नीआ च्यानासशानुअ नतुतीकचौ क्तमु लोझा लेहअओस चेतुक्रु याघाब हा हाप मी लोलचा शकाआ लेझा नेन्गथे नअ

रात्र थोडी जाहली पण--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 02/03/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
Taxonomy upgrade extras

टाटा नॅनो..

लेखक गरम मसाला यांनी सोमवार, 02/03/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वी याहु संकेतस्थळावर पहिल्याच पानावर झळकणारया बातम्यांमध्ये एका न्युजवाहिनीने टाटा नॅनोच्या आगामी आगमनाची बातमी दाखवली. जगातील सगळ्यात स्वस्त कार म्हणून ज्या कारने नाव नावलौकिक मिळवला त्या कारची जमेची बाजू मांडण्यापेक्षा त्यात किती असुविधा आहेत याच्यावरच भर देण्यात आला. शेतकरी लोकाना जागेसाठी मिळालेला कमी मोबदला व त्यामुळे केलेली निदर्शने आणि या सगळ्यांचा नेनो च्या बाजारातील आगमनावरचा विलंब या सगळ्या गोष्टींचा विशेष उल्लेख आहे. कारचा आकार किती लहान आहे हे अगदी "How many people you can squeeze into car ?" अशा संवादातून खिल्ली उडवली आहे.

मराठी संगणक प्रणाली

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 02/03/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेले अनेक दिवस मुक्तस्रोत संगणक प्रणालींचा अभ्यास करत आहे. अनेक चांगले प्रयत्न लोकांनी केले आहेत. जुमला, वगैरे अनेक प्रणाल्या फुकट उपलब्ध असतात. त्यातील अनेक प्रणालींचे भाषांतर हिंदी (मी तपासलेल्या जवळजवळ सगळ्या प्रणाल्या), तामीळ, कन्नड, सिंधी, गुजराती भाषेत झालेले आहे. मराठी भाषांतर झालेल्या प्रणाल्या अगदीच नगण्य आहेत.

जिनोम व आरोग्य

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 02/03/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील. सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते. मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो.

सँडवीच फॉर डमीज् (सचित्र मार्गदर्शन )

लेखक गणपा यांनी सोमवार, 02/03/2009 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी ही, किती ही , कुठे ही भुक लागल्यावर हमखास पोट भरणारा पण सगळ्यात कठीण (करायला. खायला नाही) पदार्थ. त्यामुळे हे गाईड समस्त मिपाकरां ना समर्पीत. (कुठे ही अश्या साठी की आत्त्ताच आलेल्या बातमी नुसार मिपाकर केवळ पृथीतलावर न्हवे तर पार वैकुंठापर्यंत पसरलेले आहेत.) कच्चा माल : ४ ब्रेड स्लाइस. १ काकडी, १ टोमॅटो, १ मोठा उकडलेला बटाटा, १ कांदा , लोणी / बटर , बीट (असल्यास / आवडत असल्यास) , हिरवी चटणी (हीची पाकृ. पुढच्या वेळी.), मीठ/चाट मसाला.