मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...
काही अपरिहार्य कारणांमुळे मध्यंतरीचा काही काळ संपादकीय सदर प्रसिद्ध करता आले नाही. मिपा व्यवस्थापन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे..
काशीस जावे नित्य वदावे...
अमेरिकेच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकन संसदेने सुमारे ८०००० करोड डॉलर्सचे पॅकेज मंजुर केले असुन त्यावर अध्यक्ष बराक ओबामा यांनी शिक्कामोर्तब केले आहे. मागील महिन्यात सत्तेवर आल्याबरोबर, आपल्या मनाप्रमाणे काम करण्यास त्यांनी सुरवात केली असल्याचे हे चिन्ह मानले जाते. लेमन ब्रदर्स ही महाबलाढ्य वित्तिय कंपनी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतर सुरु झालेला पडझडीचा आणि अरिष्टांचा वेग मंदावलेला नाही. उलट त्यात अजुनच वाढ झालेली आहे.
निवडणुक प्रचार शिगेला पोहोचलेला असतांनाच गृहकर्ज, वित्तीय आणि विमा कंपन्यांना सावरण्यासाठी भुतपुर्व अध्यक्ष बुश यांनी मदतीचा ओघ चालु केला होताच. बुश आणि ओबामा हे भिन्न पक्षाचे असल्यामुळे अरिष्टाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न होता. तरीही, ४ नोव्हेंबरला निवडणुकीत ओबामा विजयी झाले असले तरी, डेमॉक्रॅ॑टसचे बहुमत असतांना सुद्धा बुश यांचे पॅकेज मंजुर झाले होते. अमेरिकेतील वित्तीय कंपन्यांनी हे संकट आपल्यावर ओढवुन घेतलेले आहे, याची जाणीव असुनसुद्धा या कंपन्यांचे बडे पदाधिकारी, संचालक, आपल्या पोळीवर वाढीव पगार, बोनस यांचे तुप ओढुन घेत होते. यासाठी त्यांनी अनेक त-हेच्या करामती केल्या. हेराफेरी केली. ताळेबंदात चुकीचे आकडे दाखवले. हा सारा डोलारा आपल्याच वजनाने कोसळायला लागला, नोक-या धोक्यात आल्या. बुश महाशयांचा कल मात्र अशा कंपन्यांना अभयदान देवुन वाचवण्याचाच होता.
ओबामा अध्यक्षपदावर आरुढ झाल्यावर सरकारी मदत देतांना अटी घालण्यास सुरवात केली. पांढरे हत्ती जनतेच्या पैशातुन पोसले जाणार नाहीत याची ते काळजी घेण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. मंदीचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसत असतो, त्यांना मदतीची जास्त गरज असते, ती पुरवण्याचा प्रयत्न ओबामा करत आहेत ही स्तुत्य बाब आहे. वित्तसंस्थांना डुबवल्यावर, जनतेच्या पैशातुन आपले गलेलठ्ठ पगार चालु ठेवणा-यांना त्यांनी धारेवर धरले आहे. आता नवीन धोरणानुसार, त्यांनी काही अटी घातल्या आहेत. त्यामागे प्रमुख विचार अमेरिकेतील रोजगार वाचवण्याचा आणि वाढवण्याचा विचार आहे. त्यांनी 'बाय अमेरीकन' असा मंत्र दिला आहे. अमेरिकन वस्तुंचीच खरेदी करा, अमेरिकन लोकांकडुनच काम करवुन घ्या असे ते म्हणतात. आयातीच्या मार्गाने वस्तु, सेवा स्वस्त पडत असल्या तरी त्या नाकारा असा त्यांचा आग्रह आहे.
आर्थिक मंदीमुळे भारतासारख्या देशाच्या निर्यातीला भयानक मोठा फटका बसला असुन वस्त्रोद्योग, चामडे, जडजवाहिर यासारख्या क्षेत्रातील लोकांचा रोजगार गेला आहे. हाच प्रकार आयटी क्षेत्राबाबत घडत आहे. हेच चीन मधे पण मोठया प्रमाणावर घडल्याने चीनने अमेरिकन धोरणाबद्दल तीव्र नापसंती जाहिर केलेली आहे. आर्थिक मंदी हे खरे तर जागतिक संकट आहे, पण प्रत्येक देश याचा तोडगा स्वतःचाच विचार करुन काढत असल्याने याला जागतिक परिमाण लाभत नाही, त्यामुळे फारसे काही निष्पन्न होत नाही. पाश्चात्य देशात मंदीवर मात झाली, की विकसनशील देशांची अर्थव्यवस्था रुळावर येईल असे जरी म्हटले जात असले तरी हे नक्की कधी होईल याबाबत तज्ज्ञांमधेच एकवाक्यता नाही.
यामधेच भर म्हणुन ओबामा राजवटीने आपले उद्योग-रोजगार वाचवण्याच्या नावाखाली, संरक्षक धोरण स्विकारणे ठरवलेले असल्याने निर्यातक्षम देशांच्या संकटात अजुनच भर पडणार आहे हे निश्चित. चीनचा अमेरिकेशी मोठा व्यापार आहे. चीनची निर्यात अधिक आणि आयात माफक आहे. चीनच्या चमत्कारामागे परकिय गुंतवणुक आणि स्पर्धाखच्चीकरण करुन केलेला निर्यातीचा धडाका हेच होते. आता निर्यात घटताच, दक्षिण चीनमधे हाहाःकार माजला आहे. अमेरिकेचे हे धोरण चीनच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय ताकदीला मारक आहे. दुसरीकडे चिमुकल्या जपानची अवस्था अशीच कठीण झाली आहे. दुस-या महायुद्धानंतरचे तेलसंकट वगळता हे मोठे संकट असल्याचे जपान सरकारने म्हटले आहे. गेल्या चार तिमाहीतील वृद्धीचा दर झपाट्याने खाली आला आहे. आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी संरक्षक भिंत उभारणे हा तोडगा नाही असा आजवरचा अनुभव आहे, तरीही अमेरिका तो मार्ग अनुसरत आहे.
भारतात आधी महागाई नंतर मंदी अशा लागोपाठ आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी काही प्रमाणात आयात निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु अजुनही आयात पुर्णपणे बंद किंवा स्वदेशीचा नारा देण्याचे नाकारले आहे. भारतातील निर्यात ही प्रामुख्याने गरज आणि सोय म्हणुनच होत असते. अमेरिकने खर्च कमी करण्याचे धोरण म्हणुन बिपीओची कास धरली, जे आपल्याला पण सोईचे होते. आता सरकारी कामाचे ठेके मिळवायचे असतील तर, अमेरिकेतील वस्तु आणि सेवा वापरण्याची अट घालण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था संपुर्णपणे निर्यातीवर अवलंबुन नसली तरी निर्यातीचा एकुण उलाढालीत मोठा वाटा आहे.
प्रणव बाबुंनी त्यांचे पुर्वसुरी निर्यातदारांना हिरो म्हणत होते त्यापेक्षा वेगळा सुर आळवत शेतकरी हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा हिरो असल्याचे म्हटले आहे. त्यात तथ्य तर आहेच पण सरकारी पातळीवर निर्यातदारांना जी आपुलकीची, सहृदयेतेची, तसेच मानाची वागणुक मिळते तशी शेतक-यांना मिळत नाही. त्यांच्या वाजवी आणि रास्त मागण्यांकडे सरकार उद्दामपणे दुर्लक्ष करते, किमान सुविधांपासुन त्यांना वंचित ठेवले जाते हे कटु असले तरी सत्य आहे. अमेरीकन धोरणांचा परिपाक म्हणुन बसणारा फटका हा भारताला असह्य होणार आहेच. सध्या आपण सुपात आहोत हा दिलासा अल्पजीवी आहे हे निश्चित.
आणि याच कारणासाठी, १९९१ पासुन राबवलेली धोरणे आणि जागतिकीकरणाला, उदारीकरणाला दिलेले प्रोत्साहन यांचा नक्की कुणाला कसा फायदा झाला याचा लेखाजोखा काढुन त्याप्रमाणे धोरणात सुसंगत बदल घडवुन अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे प्रयत्न नव्या सरकारला करावे लागतील. तसे न केल्यास, केवळ जागतिक शक्तिंच्या हातातील बाहुले बनुन राहिल्यास, 'आम्हाला तळागाळातील लोकांना वर आणायचे आहे' ही घोषणा पुरातन काळातील 'काशीस जावे नित्य वदावे' अशा स्वरुपाचीच राहिल. प्रत्यक्षात शेतकरी, सामान्य जनता, देशी व्यापारी, देशी उद्योजक असा समाजातील फार मोठा घटक सतत रगडलाच जाईल.
पाहुणा संपादक : अवलिया.विशेष
वाचने
22390
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
संपादकीय
कशाचे दुवे
In reply to संपादकीय by सखाराम_गटणे™
उदाहरणे
अनेक
In reply to उदाहरणे by प्रदीप
बेकायदेशीर?
In reply to अनेक by अवलिया
हेराफेरी
In reply to बेकायदेशीर? by प्रदीप
- वर्षाला ४० हजार कमावणार्या कुटुंबाला ४०० हजाराचे घर विकत घेण्यासाठी कर्ज देणे...
- कर्जाची क्रिएटिव्ह (खरे तर क्रिमिनल) मांडणी करून पहिली दोन वर्षे अगदी कमी दरात आणि थोड्या रकमेवर व्याज भरण्यास परवानगी देणे.
- हे असे कर्ज १००००१% बुडित खात्यात जाणार आहे हे माहित असूनही कंपनीमध्ये सगळ्यांनी कॅश फ्लो चांगला आहे आणि बिझिनेस मॉडेल जिनिअस प्रॉडक्ट आहे असे म्हणणे....
- रेग्युलेटर्सनी माना डोलविणे आणि
- रेटिंग एजन्सीजनी "अअअ" असे शिफारस देणे...
- या कॅश फ्लोवर आधारित हुंड्या (सिक्युरिटीज) जगभरातील इन्व्हेस्टरांना विकून मूळ कर्जदात्यांनी आपले हात रिकामे करून घेणे. वगैरे वगैरे!
- त्यात पुन्हा एकदा सिक्युरायटाझेशन केले की ही कर्जे ऑफ बॅलन्सशीट ... त्यातून अर्निंग्ज्स पर शेअरच्या आकड्यांची भलतीच सुधारणा...
एक ना दोन. थोरामोठ्यांचा वरदहस्त असल्याने (गव्हर्नमेन्ट अप्रूव्हड् असल्याने) हा फ्रॉड -- महाघोटाळा -- मॅडॉफच्या थापेबाजीपेक्षाही खतरनाक आहे. * गेल्या दशकात कायदे अनेकदा बदलले गेले. चौकटीबाहेर जायला कशाला हवे? चौकटच बदला ना! -- एक शेलके उदाहरण सांगायचे झाले तर कमर्शिअल बँकांना सिक्युरिटीजचा धंदा करायला परवानगी देणे आणि प्रत्यक्षपणे सिटीला जगभर साम्राज्य उभे करण्यास सहाय्य करणे. ऑफ बॅलन्सशीट अकाऊन्टिंग हा एक आणखी स्वतंत्र विषय होऊ शकेल. निव्वळ गणित चुकल्याने ही पाळी आलेली नाही. हे गणित चुकीच्या मार्गाला घेऊन जाणार आहे हे स्पष्ट होते. ते चुकीचे आहे हे समजण्याची अक्कल वॉलस्ट्रीटच्या टोप ब्रेन्समध्ये नव्हती हे पटण्यासारखे नाही. हव्यास आणि भ्रष्टाचार (पॉवर करप्टस् ऍन्ड अबसोल्युट पॉवर करप्टस् अबसोल्युटली) यांच्या प्रभावाखाली भल्याभल्यांनी सोयीस्करपणे दुनियेला टोपी घालायला मागेपुढे पाहिले नाही असे म्हणायला भरपूर वाव आहे. तूर्तास इतकेच - एकलव्यहे सगळे मान्य
In reply to हेराफेरी by एकलव्य
फक्त नियमात बसते आहे म्हणून
In reply to हे सगळे मान्य by प्रदीप
हाईंड साईट, नीतिमत्ता इ.
In reply to फक्त नियमात बसते आहे म्हणून by चतुरंग
मान्य! ह्म्म...
In reply to हे सगळे मान्य by प्रदीप
उत्तम संपादकीय...
अग्रलेखात
In reply to उत्तम संपादकीय... by मनिष
अगदी
In reply to अग्रलेखात by अवलिया
>>आर्थिक
हे वाचा..
ह्याला फक्त
In reply to हे वाचा.. by दशानन
मग ह्या
In reply to ह्याला फक्त by मनिष
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे
संपादकीय
अधिक परिपूर्ण हवा होता..
खरेच?
In reply to अधिक परिपूर्ण हवा होता.. by सुनील
अगदी
In reply to खरेच? by प्रदीप
विदा
In reply to खरेच? by प्रदीप
भारतात ५५%
In reply to विदा by सुनील
सुनील, तुमचे बरोबर आहे
In reply to विदा by सुनील
उत्तम लेख
जरुर
In reply to उत्तम लेख by आनंदयात्री
आवडला
सहमत, तरीही शंका!!
राम
In reply to सहमत, तरीही शंका!! by पिवळा डांबिस
सत्यम,
In reply to सहमत, तरीही शंका!! by पिवळा डांबिस
>>म्हणूनच
In reply to सत्यम, by मराठी_माणूस
अमेरिकेची
In reply to >>म्हणूनच by दशानन
राजेंच्या
In reply to अमेरिकेची by अवलिया
१००%
In reply to राजेंच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवलिया, तुम
In reply to अमेरिकेची by अवलिया
अरे तु
In reply to अवलिया, तुम by दशानन
:)
In reply to सत्यम, by मराठी_माणूस
ईतर धंद्या
In reply to :) by पिवळा डांबिस
त्यासाठी
In reply to ईतर धंद्या by मराठी_माणूस
:)
In reply to ईतर धंद्या by मराठी_माणूस
मालाचा भाव
In reply to :) by पिवळा डांबिस
इथे ते
In reply to मालाचा भाव by मराठी_माणूस
ह्या
In reply to इथे ते by पिवळा डांबिस
अवलिया साहेब
विप्र
In reply to अवलिया साहेब by विनायक प्रभू
सुरेख
सहमत
In reply to सुरेख by विसोबा खेचर
बॉट्म ...
In reply to सहमत by अवलिया
सहमत!
In reply to सहमत by अवलिया
जागा रहा
माझ्या
In reply to जागा रहा by विनायक प्रभू
जनरल
In reply to माझ्या by दशानन
सरळ
काय झाले?
In reply to सरळ by विनायक प्रभू
चांगला
लेख आवडला.
अग्रलेख आवडला
या लेखाला दोन वर्षे होऊन