Skip to main content

Blog

लेखक श्रावनि यांनी बुधवार, 04/03/2009 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
Blog कसा तयार करतात ?

बॅलन्स 'शीट'

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 04/03/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
" सर, जरा मदत हवी होती". एका मिपा वाचकाचा मला फोन आला. ह्या सदस्याने त्याच्या १० वीत असलेल्या मुलाकरता मला ऑक्टोबर मधे संपर्क केला होता. त्याच्या बरोबर आणखी २० मुले आणि पालक होते. नेहेमीप्रमाणे कार्यक्रम झाला. मुले आणि पालक खुष झाले. मी अशा कार्यक्रमाची फी घेत नाही हे आधीच सांगितले होते तरीसुद्धा सर्वांनी मिळुन एक सुंदर सरस्वती ची मुर्ती दीली आणि मी ती घेतली. घरी नेउन मुर्तीची देवघरात स्थापना केली. पण हा फोन वेगळ्या कारणाकरता होता. त्यांना आर्थिक नियोजनात मदत हवी होती. आता मला आर्थिक नियोजन विचारणे म्हणजे "उघड्याकडे गेल वागडे, आणि रात्रभर कुड्कुडले" अशातली गत होती.

थंडीतली सकाळ

लेखक सहज यांनी बुधवार, 04/03/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
पंखा सुरू, पांघरुण ओढले, दिवा लागतो उठ आता, वेळ झाली, बाबांची विरत जाणारी आरोळी मग आई हळुच आत येते पंखा बंद करुन, उठ हा आता डोक्यावरुन हात फिरवून जाते पुन्हा एकदा बाबा येउन आज नाही आहे का ग क्लास? माझ्याजवळ उभे राहुन आत आईला मोठ्या आवाजात प्रश्न. चहा घ्या, पेपर आलाय आईचे बांबाना बाहेर बोलावणे अरे पावणेसात झाले असे आई म्हणताच ओह नो!
Taxonomy upgrade extras

"डुर्र" मच्छराचा त्रास

लेखक सुनील यांनी बुधवार, 04/03/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
"डुर्र" मच्छराचा त्रास ठाणे ४ मार्च २००९ (आमच्या बातमीदाराकडून) - येथिल सुप्रसिद्ध अशा मिसळपाव नावाच्या हॉटेलात सध्या "डुर्र" जातीच्या मच्छराने थैमान घातले आहे, असा आमचा ठाणे येथिल बातमीदार कळवितो. हा मच्छर अगदी नव्या प्रजातीचा असल्यामुळे, त्यावर अक्सर इलाज अद्याप सापडला नसल्याचे समजते.

रात्र वैर्‍याची... दिवस शैतानाचा ;)

लेखक दशानन यांनी बुधवार, 04/03/2009 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक बझारांमध्ये चालू असलेली पडझड व विकास दर (ग्रोथ रेट) कमी होण्याच्या भितीमुळे मार्केटमध्ये काल प्रचंड विक्री झाली व ह्याच्या मुळे बीएसई चा सेंसेक्स मागच्या आठवड्यापासून चालू असलेला डाऊन ट्रेन्ड ह्या आठवड्यात पण चालूच राहिला काल जेव्हा मार्केट बंद झाले (-१७९.७९) तेव्हा सेंसेक्स ८४२७.२९ वर बंद झाला ह्याच्या आधी १०/११/२००५ मध्ये मार्केट ८३.०८.९३ वर बंद झाला होता म्हणजे आपण सरळ तीन वर्षमागे आलो व निफ्टी २६२२.४० वर बंद झाली.

(आच्छू)

लेखक विकास यांनी बुधवार, 04/03/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
बोचर्‍या थंडीत हळू हळू पडणारा बर्फ विश्व गोठलेले असे वाटताना नाक मात्र वितळते... आच्छू आच्छू वसंताच्या हालचालीने झाडांना येणारा मोहर हवे मधून परागकण पसरवत जातो आणि परत... आच्छू आच्छू आच्छू पावभाजी करताना कांदे, बटाटे, मटार, टोमॅटो वगैरे घालून शेवटी वरचेवर मसाला घालताना अचानक उडून नाकात जातो आच्छू आच्छू आच्छू आच्छू -
Taxonomy upgrade extras

(फुर्र)

लेखक पॅपिलॉन यांनी बुधवार, 04/03/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
कळकट मळकट टपरीवर जाऊन - खिशातले सुट्टे पैसे चाचपडत मागवलेले एकच कटिंग दोघात.. फुर्र फुर्र पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर - एकच मिसळ, दोन पाव आणि तर्री... फुर्र फुर्र फुर्र निरोप देताना, जन्मजन्मांतरीची साथ असे डोळ्यात पाणी आणून सांगून - थिरकणार्‍या बारबालेल्या अदाकारीकडे पाहून, नाकात गेलेली बियर.... फुर्र फुर्र फुर्र फुर्र
Taxonomy upgrade extras

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

भिंगरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 04/03/2009 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला "फारमात" दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले, "मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर "चर्वीचरण" करायला हूक्की आली आहे" मी म्हणालो, "भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे.?

<<रात्र थोडी जाहली पण>>

लेखक नाटक्या यांनी बुधवार, 04/03/2009 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्कराज यांनी केलेल्या "रात्र थोडी जाहली पण" याचे विडंबन. पुष्कराज: ह. घ्या. कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या पिण्याची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या चाकण्याची नुकतीच वाटी सारी सरुनी चाकण्याला केळी आली कहर पुन्हा झाला असा की जेवण्याची वेळ झाली दारूस माझ्या आजवरी मी गाली कैक हो वाहिली गंध ऐसा त्या सूराचा नशा आजही राहीली त्याच नशेने अजुनी पिण्याला बहर आहे रात्र थोडी जाहली पण सोंगे बाकी फार आहे - नाटक्या गैरसमज नको माझ वय फक्त ८५ आहे