पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली...
मिसळपाव
