लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग २)
लग्नाच्या `बाजार'गप्पा (भाग १)
स्थळ ः सिंधुदुर्गातील कुडाळमधील एक छोटेखानी घर.
वेळ ः दुपारी चारची.
पात्रे ः अस्मादिक व मातुःश्री.
-----------
पार्श्वभूमी ः
कोकणातील व्यवस्थित घर, मुलगी साधीसुधी, आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष वगैरे. त्यामुळे मातुःश्रींच्या एकदम सर्वाधिक प्राधान्यातली. "नाकारण्याचा प्रश्नच नाही!' या गटातली. त्यामुळे भेटून "पारखण्यासाठी' स्वतः मातुःश्री हजर. पण मुलगी मुंबईला काही कामासाठी गेलेली. आम्ही गोव्याहून मावशीकडून थेट कुडाळात दुपारी दाखल.
(डास)
या तनुचा माझ्या करशी दररोजचा घास तुझा
डोंबिवली वा धारावी, घरभर हा वास तुझा
तू जळी अन् तू नाली, इवलासा श्वास तुझा
ए.सी.च्या खालीसुद्धा रंगतो तो रास तुझा
मॉर्टीन असो वा कछवा, धसका जीवास तुझा
गुणगुणता कानी करती सगळे दुस्वास तुझा
नाना रुपे बळावे अवतार तो, भास तुझा
डेंग्यू अन् मलेरियाचा आजारी खास तुझा
तारशील भवसागरी? मागे घे डास तुझा
झोपु दे जरासे रात्री, प्रभु मी रे दास तुझा
प्रेरणा: क्रान्ति ताईंचा दास
शुन्य साखरे ची पौष्टिक खजुर बर्फी
थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'
थोरांची ओळख
जालिंदर जलालाबादी :
या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे.
जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला.
त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.
दास
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सार्यांतच भास तुझा
तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा
अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा
नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा
तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा
माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.
`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!
अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं.
मुंबईच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला.मिसळपावची जडण घडण !
आपलं मिसळपाव वापरायला जास्तीत जास्त सोप्पं आणि सुरेख करण्याचं ठरलेलं आहे. ह्या कामात मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्या मिपाकरांना या धाग्यावर मिसळपाव बद्दल अपेक्षा, बदल आणि वेगवेगळ्या संरचना सुचवण्याबद्दल आवाहण करीत आहोत.
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं? ते अधीक चांगलं कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं नाही? ते बरोबर कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?
रोजच्या काळात मिसळपाववर वावरतांना काय अश्या बाबी आहेत की ज्या अधीक चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत?
मिसळपाव