Skip to main content

रेल्वे बजेट - परत एकदा निराशा

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 03/07/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या पश्चिम, मध्य, हार्बर प्रवाशांतर्फे ममता बॅनर्जींचा जाहीर निषेध !!
नव्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पाने मुंबईकरांची घोर निराशा केली आहे.प्रवासी भाड्यात कुठलिही भाडेवाढ न होणे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराच्या डायरीच्या निमित्ताने

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 03/07/2009 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
मायबापहो, १० जुन पासुन मी दैनिक बोम्बाबोम्ब मधला प्रशिक्षणार्थी पत्रकार प्रमोद भोंडे (पम्या) याची डायरी मिसळपावमार्फत आपल्यापर्यंत घेवून आलो. जरी मराठी माणुस असलो अन वाचन हे माझे व्यसन असले तरी अशाप्रकारचे लिखाण मी करण्याची ही पहिलीच वेळ. अर्थातच त्यात अनेक त्रुटी होत्या. पण आपण माझा हा वानवळा गोड मानुन घेतला, रोज मी जे वेडेवाकडे लिहिले ते वाचले, माझे उदंड कौतुक केले, प्रतिसाद दिले अन प्रोत्साहनही यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेव्हढे थोडेच आहेत. ही डायरी लिहीत असताना अनेक जणांनी मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, काहींनी अचुक अंदाज बांधले तर काहींनी मला तसे विचारलेही.

यशस्वी ??

लेखक अनंता यांनी शुक्रवार, 03/07/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही पाहिलंय कधी मुलांना दुडूदुडू धावतांना? ऐकलाय का कधी पाऊस भुईवर टप् -टप कोसळतांना? धावलाय कधी गिरक्या घेत फुलपाखरांच्या संगे? पाहिलाय सूर्य लपतांना झाकोळत्या ढगांमागे? सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही सुसाट जाता का? 'काय, कसं काय' विचारतांना उत्तर येईपर्यंत थांबता का? लेकराला कधी म्हणत असाल 'आपण हे उद्या करू' गडबडीत तेव्हा पहातही नसाल त्याच्या डोळ्यातले अश्रू आता संपर्क राहिला नसेल मित्र - मित्र दुरावलेला कारण तुम्हाला वेळ नसेल साधं 'क्षेम' पुसायला कुठेतरी पोहोचण्यासाठी धावता तुम्ही जोरात हरवून बसता सगळी गंमत वेगाने धावण्याच्या नादात आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे अंधारात दीपस्तंभ व्हावे ग
Taxonomy upgrade extras

कुरुक्षेत्र

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 03/07/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
मास्तरने आजवर महाभारताबद्दल पुस्तकात वाचलेले आणि मोठ्यानी (बी. आर. चोप्रा) सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता. मिपावर आल्यानंतर त्याच्या भोळ्या मनाल तडा गेला. मिपा वरच्या काही सद्स्यानी त्याने ५० वर्ष बाळगलेल्या कल्पनांचा चुराडा केला. 'साडी सप्लाय", करुन गेला गाव आणि देवांचे नाव (पांडव जन्म) व इतर कल्पनांच्या मिपावरच्या खुलाशांनी मास्तरखंतावला. ___________________________________________________________ शेवटी अर्जुन कुरकुर करत एकदाचा युद्धाला तयार झाला.कृष्ण घाम पुसत आत्ता येतो म्हणून रथ आणायला गेला.अर्जुनानी धार लावायचा दगड घेऊन बाणांना टोकं काढायला सुरुवात केली.

आठवणी.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 03/07/2009 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी..... सरी पावसाच्या नभी दाटलेल्या ऊरी आठवांच्या लडी साठलेल्या ! तशा मावल्या ना तुझ्या आवडी ही सदाच्याच अमुच्या झोळ्या.....फाटलेल्या ! कफल्लक कवीच्या न वाट्यास नट्टा, तरी शृंगार भरल्या.....गझल थाटलेल्या ! अवचित् कधी शेपटा त्या वेणीचा जरा स्पर्शताही .....मुठी.. चाटलेल्या ! सखे राहिले ना वसंतास भान बघुनी तुला त्या.....यौवनी घाटलेल्या ! अता एकदा हा मोगरा माळू दे ना तुझ्या मोकळ्या केसांत्.....काटलेल्या ! करपून गेला बहर बघ कधीचा अता कृष्ण म्लान .....गौळणी बाटलेल्या !
Taxonomy upgrade extras

समलिंगी संबंध हा गुन्हा नाही: दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

लेखक मेघना भुस्कुटे यांनी शुक्रवार, 03/07/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने समलिंगी संबंध ठेवू इच्छिणार्‍या लोकांना नवे बळ मिळाले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा बातमीचा दुवा: http://www.loksatta.com/daily/20090703/mp02.htm