मुंबईच्या पश्चिम, मध्य, हार्बर प्रवाशांतर्फे ममता बॅनर्जींचा जाहीर निषेध !!
नव्या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पाने मुंबईकरांची घोर निराशा केली आहे.प्रवासी भाड्यात कुठलिही भाडेवाढ न होणे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
मात्र सामान्य मुंबईकर लोकल प्रवाशांच्या खुप अपेक्षा ( १२ -१५ डब्यांच्या लोकल, लोकलच्या संख्येत वाढ, ठाणे- पनवेल लोकल, हार्बर लाईनचा गोरेगाव पर्यंत विस्तार इत्यादी) असताना आणि रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल मुंबईतून मिळत असताना यातील एका ही मागणीचा विचार न केला जाणे यासारखी वाईट गोष्ट नाही.
आता गरज आहे ती महाराष्ट्रातील / मुंबईतील सर्व खासदारांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी/ मुंबईसाठी आवश्यक असणार्या सर्व मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दबावतंत्र/ आंदोलन याचा मार्ग अवलंबण्याची. ( राज साहेबांनी बरोबर म्हणले होते आता महाराष्ट्राचा आवाज लोकसभेत कोण उठवणार? )
दरवर्षी प्रमाणे रेल्वे मंत्र्यांच्या राज्यातून मुंबईत एक तरी नवी गाडी चालू होणे आणि परप्रांतीयाची लोकसंख्या अबाधीत ठेवणे ही प्रथा या वर्षीदेखील नवीन रेल्वे मंत्र्यांनी मोडीत न काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !!
किंबहूना आपल्या लोकांना मुंबईत जलद पोहोचता यावे म्हणून हावडा- मुंबई विना थांबा रेल्वेची घोषणा करुन पाटणा - मुंबई एक्स्प्रेसवर मात केली आहे.
( यापुढे ही प्रथा बंद होण्यासाठी मा. पवार साहेबांनी रेल्वे खाते आपल्याकडे पर्यायाने महाराष्ट्राकडे घ्यावे. आणि दरवर्षी नवीन गाडी चालू करण्या एवजी मुंबईहून पटणा, हावडा येथे जाणार्या अगणित गाड्यांपैकी एकेक गाडी रद्द करावी )
चला इथेच थांबतो. ५.१२ ची नऊ डब्यांची वाशी लोकल पकडायला पळायला पाहि़जे.
(आपला लोकल )अमोल
वाचने
3129
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
ति**ला त्या रेल्वे मंत्र्यांच्या
९०च्या
क्षमतेच्य
In reply to ९०च्या by नितिन थत्ते
खासदार
आता गरज
>>लेखात
रेल्वे बजेट
सहमत ----------------
In reply to रेल्वे बजेट by हरकाम्या
मा. पवार साहेबांनी रेल्वे खाते आपल्याकडे पर्यायाने.....
In reply to सहमत ---------------- by अमोल केळकर
महाराष्ट्
>>दरवर्षी