तुम्ही पाहिलंय कधी मुलांना
दुडूदुडू धावतांना?
ऐकलाय का कधी पाऊस
भुईवर टप् -टप कोसळतांना?
धावलाय कधी गिरक्या घेत
फुलपाखरांच्या संगे?
पाहिलाय सूर्य लपतांना
झाकोळत्या ढगांमागे?
सकाळपासून रात्रीपर्यंत
तुम्ही सुसाट जाता का?
'काय, कसं काय' विचारतांना
उत्तर येईपर्यंत थांबता का?
लेकराला कधी म्हणत असाल
'आपण हे उद्या करू'
गडबडीत तेव्हा पहातही नसाल
त्याच्या डोळ्यातले अश्रू
आता संपर्क राहिला नसेल
मित्र - मित्र दुरावलेला
कारण तुम्हाला वेळ नसेल
साधं 'क्षेम' पुसायला
कुठेतरी पोहोचण्यासाठी
धावता तुम्ही जोरात
हरवून बसता सगळी गंमत
वेगाने धावण्याच्या नादात
आयुष्य म्हणजे शर्यत नव्हे
अंधारात दीपस्तंभ व्हावे
गीत संपून जाण्याआधी
त्यातले संगीत ऐकायला हवे!
याद्या
1511
प्रतिक्रिया
6
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
साधी सोपी
कविता फार आवडली
अंतर्मुख
खूप खूप आवडली.
सुन्दर
कविता खूप आवडली....