दिव्याची अवस.
कालचा दिवस दिव्याचा अवसेचा. दिव्याच्या अवसेच्या दिवशी मला प्रकर्षाने आठवण होते ती आई करत असलेल्या कणकेच्या उकडलेल्या दिव्यांची आणि चाळीत शेजारी रहाणार्या नलिनीकाकूंची.
लहानपणी गावी चातुर्मासाचे दिवस जाणीवपूर्वक आणि श्रध्देने जपले जायचे. नंतर येणारा श्रावणमहिना आधीच दिव्याच्या अवसेतून हूरहूर लावत असे. दिव्याच्या अवसेला आई आम्हा सर्व भावंडांच्या संख्येइतके कणकेचे गोड, उकडलेले दिवे करत असे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्याची आरती करून देवाला नैवेद्य दाखवित असे.
मिसळपाव