Skip to main content

प्लॉटच्या कर्जासाठी माहिती हवी आहे!

लेखक राजमुद्रा यांनी गुरुवार, 22/10/2009 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी PCMC हद्दीमध्ये प्लॉट पाहिला आहे. तो मला कर्ज क्कगून घ्यायचा आहे. पण त्या प्लॉटचे NA झालेले नाही. मला माहिती हवी आहे की NA नसताना मला कर्ज मिळेल का? मिळत असेल तर कुठल्या Bank मधून मिळेल? जर मी स्वतः NA करून घेतले तर किती खर्च येईल? कॄपया जाणकारांनी मदत करावी. यासंदर्भात कुणी जणकार असतील तर त्यांची मदत मिळाली तर बरे होईल. मदतीच्या अपेक्षेने वाट पाहणारी राजमुद्रा :)

पहा निकाल अपडेट

लेखक भोचक यांनी गुरुवार, 22/10/2009 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचं अपडेट येथे नकाशाद्वारे पहायला मिळेल. नकाशावर कर्सर नेल्यास राज्याची एकूण स्थिती कळेल. नकाशावर क्लिक केल्यास प्रत्येक मतदारसंघातील स्थिती कळेल. येथे टेक्स्ट व्ह्यू पहायला मिळेल.

महाराष्ट्रातील राजकारणाची कुंडली...

लेखक विकास यांनी गुरुवार, 22/10/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
अजून थोड्याच वेळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल लागणार आणि तमाम राजकारण्यांचा निकाल लागणार... तर अशा या निवडणूकीत म.टा. मधे म्हणल्याप्रमाणे आघाडीस इजा-बिजा-तिजाचे तर युतीस सत्तांतराचे वेध लागले आहेत.

स्क्रँबल्ड फ्रेंच टोस्ट

लेखक प्रभो यांनी बुधवार, 21/10/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्क्रँबल्ड एग्स (मसाला कमी असलेली / नसलेली अंडा भुर्जी) व फ्रेंच टोस्ट आपण नेहमी खातोच.....

थाई फ्राईड राईस

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 21/10/2009 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच्या चायनिज फ्राईड राईस पेक्षा आमच्या घरी थाई फ्राईड राईस जास्त आवडतो. करायला सोपा आणि झणझणीत. साहित्य १ १/२ कप तांदुळ (थाई मिळाला तर उत्तम नसेल तर आपला नेहमीचा कोलम पण बासमती नको. ) २ टे. स्पून तेल+ १ टे. स्पून तेल १ कांदा, चिरून १ लाल ढब्बू मिरची चिरून (हिरवी चालेल) २ बोनलेस स्कीनलेस चिकन ब्रेस्ट बारीक तुकडे करून २-३ लसुण पाकळ्यांची पेस्ट ( मी नुसत्या बारीक चिरून घेते) १ टे. स्पून रेड थाई करी पेस्ट(mae ploy ब्रँड छान आहे), झणझणीत हवे असेल तर जास्त वापरा.

बाबा कदम कालवश झाले.

लेखक नरेन यांनी बुधवार, 21/10/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.

दुरितांचे तिमीर जावो

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 21/10/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल आमच्या कडे वीज गेली (वीज म्हणजे याना गुप्ता नव्हे) . गेली म्हणजे काय जायचीच होती. आलेली वीज जायचीच. ते लोड शेडींग का काय ते म्हणतात ना त्याचाच परिणाम. वेळ दिवेलागणीची होती हे मूद्दाम सांगायला नको. वीज गेल्यावर नेहेमी सारखाच पोरांचा गोंगाट , तरुणांचा चित्कार असे ध्वनी निघाले. घातलेले फाटके बनीयन काढून मी नेहेमी सारखा चाळीच्या पॅसेज मध्ये जाऊन उभा राहीलो. " अहो निदान अंगात कपडे घाला" आमची सौ " अग अंधारात कोण बघतय मला ? " " तुम्हाला काही समजच नाही. आत्ता लगेच दिवे आले तर ? " " अग आत्ताशी कुठे गेले आहेत. येतील सावकाशीने.

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल.