Skip to main content

विंडोज व्हिस्टा मध्ये काही गेम्स चालत नाहीत त्यासाठी काय करावे? व्हिस्टा सोबत आणखी एक ओ. एस. कशी टाकावी?

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 25/01/2010 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही गेम्स मी जेव्हा "विंडोज व्हिस्टा" मध्ये इंन्स्टॉल करायला जातो, तेव्हा एक मॅसेज येतो की, धीस इज नॉट अ वॅलीड वीन ३२ ऍप्लिकेशन. त्यासाठी मी एक "डॉस बॉक्स" हा फ्री प्रोग्रॅम टाकून पाहिला, तरीही ते गेम रन करता येत नाही. पण, व्हिस्टा मध्ये "डॉस बॉक्स" च्या आधारे "डॉस गेम्स" चालतात (उद- डेव्ह, बायो-मेनॅस, लायन कींग वगैरे). पण, विंडोज व्हिस्टा" मध्ये नीड फॉर स्पीड, तसेच व्ही कॉप वगैरे हे गेम्स चालत नाहीत.

नवे संकेतस्थळ .

लेखक नरेश_ यांनी रविवार, 24/01/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, माझा पुतण्या सिद्धार्थ याने एक नवे मराठीसंस्थळ विकसीत केले आहे :) www.abhayaranya.com असे संस्थळाचे नाव असून औपचारिक उद्घाटन होणे बाकी असले तरीही मी आपणास ते पाहण्याची विनंती करत आहे. काही चुका, त्रुटी असल्यास नजरेस आणून द्याव्यात. धन्यवाद.

साठी बुद्धी...

लेखक विकास यांनी रविवार, 24/01/2010 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
या मंगळवारी, २६ जानेवारी २०१० ला अधुनिक भारताचे प्रजासत्ताक झाले, त्याला ६० वर्षे होत आहेत. त्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना तसेच भारतवंशीयांना शुभेच्छा! व्यक्तीच्या आयुष्यासंदर्भात, मराठीत एक मजेशीर वाक्प्रयोग आहे: "साठी बुद्धी नाठी". त्याचे एक कारण असे सांगितले जाते की, साठाव्या वर्षांनंतर माणूस म्हातारपणा कडे झुकायला लागल्यावर परत लहान मुलासारखा वागायला लागतो, वागणे बदलू लागते, इत्यादी...मात्र राष्ट्राच्या बाबतीत असे म्हणणे अवघड आहे.

होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 24/01/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
कबुतराच्या अचूकतेने घरी परतण्याच्या कुशलतेची माहिती मानवाला खूप आधी पासुन होती असे दिसते. ह्या कुशलतेचा वापर मानवाने लगेचच केला. ज्यांना हे कळाले की, कबुतरांमधेच असे काहीतरी विषेश आहे त्यांची स्तुती केलीच पाहिजे. इजिप्त्शियन संस्कृतीत कबुतरांचा वापर झाल्याचे दाखले आहेत. भारतीय पुराणात काही दाखले आहेत की नाही माहीत नाही. दुसऱ्या विश्वव्यापक युद्धात जर्मनीने कबुतरांचा वापर निरोप्या म्हणून तर केलाच पण त्यांच्या मानेखाली बटू-क्यामेरे लावून चित्रफित मिळवली व युद्धात ह्या माहितीचा वापर केला.

बर्फशिल्प

लेखक मस्तानी यांनी रविवार, 24/01/2010 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ...

गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही

लेखक बट्ट्याबोळ यांनी शनिवार, 23/01/2010 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर! तुमचा काय अनुभव? काही वर्क अराउन्ड ?? संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

कोणता झेंडा घेऊ?....

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 23/01/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
राजभाषेचा साज असलेला मुकुट डोक्‍यावर लेऊन मंत्रालयासमोर ताटकळणाऱ्या माय मराठीचे गेल्या आठवड्यात चहूदिशांनी धिंडवडे निघाल्याने मराठीचा अवस्था आणखीनच केविलवाणी झाली आहे. शेकडो निरपराधांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब न्यायालयात मराठीतून बोलला, याचा अभिमान वाटावा, की महाराष्ट्राच्या राजधानीतदेखील मराठीचे केवळ कामचलाऊ ज्ञान पुरेसे आहे, असा घूमजाव पवित्रा घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची कीव करावी, अशा दुहेरी संकटात महाराष्ट्राची माय मराठी सापडली आहे.