Skip to main content

सुहास शिरवळकर ह्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 30/01/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
' सुहास शिरवळकर असे आणि तसे ' संपादक :अनिल किणीकर प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन प्रकाशन हस्ते : श्री. द.मा. मिरासदार , श्री. ह्. मो. मराठे दिनांकः ७ फेब्रुवारी २०१०, सायं ६ वा. स्थळः पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे. सुहास शिरवळकर यांचा निधनानंतर असा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. ग्रंथात, चित्रपट, कला , साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. फॅन, कुटुंबीय यांनी शिरवळकर यांचावर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून लेख लिहले आहेत. प्रकाशनाच्या दिवशी सु.शि.

हे आय आय टी वाले जातात तरी कुठे?

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 30/01/2010 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आजपर्यंत दरवर्षी ५००० आयायटी उच्चशिक्षित तयार होतात. गेल्या वर्षीपर्यंत ह्यांची संख्या किती असेल हे मला निश्चित माहित नाही पण ते २ ते २.५ लाख असावेत असा माझा अंदाज आहे. हे देशातील अत्यंत उच्च प्रतिचे शिक्षण घेतलेले नागरीक आज कुठे आहेत? तुम्ही-आम्ही सामान्य नागरीक पुण्यात कशी मेट्रो पाहिजे आणि रस्ते कसे पाहिजे, शिक्षण कसे पाहिजे आणी पत्रकारीता कशी पाहिजे ह्याच्या चर्चेत गुंग आहोत. पर्यात सुचवतो आहोत; काहीतरी बदल हवेत म्हणतोय आपापल्या कुवतीप्रमाणे विचार व्यक्त करतोय. ह्या आयायटी वाल्यांचे किती ब्लॉग आहेत? ते त्यावर काय लिहिताहेत?

श्रिखंड

लेखक गणपा यांनी शनिवार, 30/01/2010 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
श्रिखंड न आवडणारा मराठी माणुस विरळाच. आमच्या परम मित्र श्री. सहजरावांनी आम्हाला ही खालील श्रिखंडाची कृती दिली. या पुर्वी मी श्रिखंड कधी घरी बनवल नव्हत. नाही म्हणायल खुप लहन (यत्ता ४थी) असताना आईने बनवल होत. त्यामुळे सहजरावांनी दिलेली कृती कधी एकदा करुन पहातो अस झाल होत. त्यामुळे या पाककृतीचे खरे श्रेय आपल्या सहजरावांना. आम्ही फक्त निमित्तमात्र इथे टाकायला. चांगले ताजे घट्ट दही घावे.

बटाटेवडे

लेखक प्रभो यांनी शनिवार, 30/01/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी संपत आला. पहिल्यांदा गड्डा मिस झाला. अरे....समजलं नसेल ना मी काय म्हणतोय ते? मी बोलतोय सोलापुरच्या जत्रेबद्दल, ज्याला सोलापुरातले सगळे गड्डा म्हणतात. साधारण जानेवारीचा पूर्ण महिना जत्रेची तयारी आणी जत्रेला भेट देण्यातच जातात. ५-६ तारखेपासून गड्ड्याची तयारी सुरू होते. आणी गड्डा सुरू होतो १० तारखेपासून.भोगी,संक्रांतीला जास्त महत्व असायचं जत्रेत. काठ्यांची मिरवणूक, अनवाणी चालून ६८ शिवलिंगांना अभिषेक, सिद्धरामेश्वरांचे काठीसोबत लग्न आणी शेवटी दारूकामाची आतिषबाजी.... बाकी जत्रा म्हणजे अशी काही वेगळी असणारे गावचे रितीरिवाज सोडून.

काकमित्रा

लेखक सागरलहरी यांनी शुक्रवार, 29/01/2010 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अंतीच्या कळान्चे | जिवाला लागीर | सोसेना उशीर | काही केल्या || भयकारी चित्र | दिसते सर्वत्र | घरदारा पुत्र | धूसरती || धुमस ही कंठी | नाही येत ओठी | राहिल्या त्या गोष्टी | सांगायच्या || सांगितल्याविण | समजावे मन | उतरावे ऋण | कसे आता || पिन्डाला वेढीन | गुज सुचवीन | मग घास देइन | काक मित्रा || - सागरलहरी

जालिंदर बाबा : पत्रकार समिक्षक ?

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर बाबा... संचार नावाची विचित्रपट समिक्षणाची मालिका मिपावर पूर्वी वाचत असे... चांगले चित्रपट शोधून शोधून त्यांना (घासुनपुसुन गुळगुळित ) मोहक बनवण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...

प्रसारमाध्यम स्वरुप, कारणे आणि उपाय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वर सध्या राजु परुळेकर: राजकीय पत्रकार? या भडकमकर मास्तरांनी मांडलेल्या काथ्याकूट मधे अनेकांनी चर्चा केल्यात. ३ जानेवारी २०१० ला अंनिस द्विदशकपुर्ती समारंभात पुण्यातील एसेम जोशी सभागृहात प्रसार माध्यम हा विषय परिसंवादासाठी घेतला होता. संजय आवटे हे तरुण पत्रकार सध्या पुढारीचे निवासी संपादक व सकाळ टाईम्स चे श्री आनंद आगाशे हे पत्रकार यानिमित्ताने बोलत होते. प्रसारमाध्यमातील वृत्तपत्रे व दृकश्राव्य माध्यमे यांचे वेगाने बदलत जाणारे स्वरुप हा समाज बदलाशी निगडीत आहे. पत्रकार हे त्यांचे प्रतिनिधि.

नाहीश्या होत चाललेल्या पाककृती

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 29/01/2010 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज एक लेख वाचता वाचता "धनगरी मटणा"चा उल्लेख पाहीला. मी आंतरजालावर शोधूनही पाहीलं पण त्याबद्दल माहीती काही मिळाली नाही. (कुणाला ठाऊक असेल तर नक्की द्या...).