Skip to main content

काही शब्दांची व्युत्पत्ती

लेखक नितिनकरमरकर यांनी गुरुवार, 25/03/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखन संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. काही भारतीय शब्दांची मला लक्षात आलेली व्युत्पत्ती वर येथे चर्चा करण्याचा मानस आहे, मला जे वाटते आहे ते कदाचित चूक असू शकेल तरी यावर जर कोणी जास्त प्रकाश टाकू शकले तर हवे आहे. १. जपान ला गेल्यावर सुरवातीला जे शब्द शिकलो त्यात पान (Pan) हा शब्द होता, त्याचा अर्थ पांव! (Bread). एकतर मी शाकाहारी असल्याने पांवावर जास्तच भर होता आणि शब्द आपल्या पांव च्या जवळ असल्याने लवकर लक्षात राहिला. थोडा विचार केल्यावर लक्षात आले की मराठी पांव (पा वर अनुस्वार आहे.

ओरिसाच्या खेड्यातील एक दिवस...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/03/2010 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी ओरिसा कृषी मंत्रालयासाठी एक छोटासा सर्व्हे प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणुन भुवनेश्वरला गेलो होतो. भुवनेश्वरपासुन साधारण १०-१५ किमी अंतरावर असलेल्या बलियंता नामक छोट्याशा गावातील एका शेतात आम्ही कॅडस्ट्रल मॅपिंगसाठी हा सर्व्हे केला. आमची कंपनी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स (GPS) विकते. GPS वापरुन शेती किंवा शेतांचा सर्व्हे हा प्रकार युरोपात सर्रास वापरला जातो. पण भारतात अजुनही हे तंत्रज्ञान वापरले जात नाही. इथे अजुनही सॅटेलाईट इमेजरीच्या साह्याने काही गणिते बांधुन कॅडस्ट्रल मॅपिंग केले जाते.

मोहन वाघ, नाट्यक्षेत्रातला एक दिग्गज!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 25/03/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार मोहन वाघ यांना मिपा परिवाराची विनम्र आदरांजली.. तात्या.

वैष्णव जन तो तेने कहिए

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 25/03/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
"वैष्णव जन तो तेने कहिए" हे गुजराती भाषेतील अप्रतिम गाणे इंटरनेट वर (मोफत) कुठे मिळू शकेल त्याची कृपया माहिती द्यावी. मी coolgose , youtube आणि torrent वर बराच शोध घेतला पण अपेक्षित audio quality कुठेही मिळू शकली नाही. आपल्या मिपाच्या व्यासंगी आणि रसिक सभासदांना या माध्यमातून सहकार्य करण्याची नम्र विनंती करतो.

हिशेब पाप-पुण्ण्याचा ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 25/03/2010 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब पाप-पुण्ण्याचा ! ! ! हिशेब पाप-पुण्ण्याचा चित्रगुप्त दरबारी चालला, धाडती स्वर्गात अन नर्कासी सकलां देऊनी पाप-पुण्ण्याचा दाखला ! !.. वेळ मजवर आली जवां नरकात मजला लोटले, शेजारच्या सुन्दरीस मात्र त्याने स्व- शयनगृहे धाडिले ! !. निरंजन वहालेकर
काव्यरस

पॅन्झी

लेखक मि.इंडिया यांनी गुरुवार, 25/03/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी पॅन्झीची फुले माझ्याकडे यावीत म्हणून रोपे बनवण्याचा प्रयत्न अखेर या वर्षी जमला. ही फुले अमेरिकेत हौशी लोक बर्‍याच प्रमाणात लावतात अशी माझी माहिती आहे. तेथील मिपाकर अधिक सांगू शकतील. पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास मी तरी फारशी बघितलेली नाहीत. हवामानाचा विचार करता पुण्यात बहुतेक थंडीतच जमेल असे मला वाटते.

भारतीय कायदे आणि पुराणातील संदर्भ

लेखक II विकास II यांनी गुरुवार, 25/03/2010 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात कृष्ण-राधा यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे भारतीय कायद्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरवात केली. या गोष्टीची स्तुती करावी तितकी थोडीच. ज्या देशाचे सरकार राम अस्तित्वातच नव्हता, त्याच देशाचे न्यायालय कृष्णाचा आधार घेते, ह्यातच खूप मौज सामावली आहे. असो. ह्याने काही नवीन प्रश्न सामोरे येण्याची शक्यता आली आहे. न्यायालयाने हिंदूंच्या देवाचा दाखला दिला, ह्यामुळे, सरकारच्या अधर्मी( म्हणजे धर्मरहीत) प्रतिमेला तडा गेला असेल काय?

किल्ले दुर्ग आणि धाकोबा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 25/03/2010 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले दुर्ग आणि ढाकोबा (मुरबाड परिसर) शनिवारी पहाटे ५.०० च्या सुमारास ठाण्याहुन बाईकवरुन निघालो. दोघेच. मुरबाड एस्.टी. स्टॅन्डवर आलो तेव्हा ७.३० वाजत आले होते. वाफाळलेला चहा घेतला आणि रामपुर या दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या गावात जाण्याचा रस्ता विचारुन घेतला. स्टॅन्डच्या बाजुनेच जो रस्ता धसईला जातो त्याच रस्त्यावर पुढे रामपुर लागते. रामपुरला येईपर्यंत ८.३० वाजत आले. रामपुर गावात एका घराच्या अंगणात बाईक लावली आणि जरा वाट दाखवायला कोणी मिळ्तय का त्याची चौकशी सुरु केली. रामभाऊ नावाचे एक मामा वाट दाखवायला तयार झाले. लगेच निघालो.